शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

‘प्रतिबिंब’सह रहस्यमय ‘शू...कुठे बोलायचे नाही’चे सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 1:07 AM

महानिर्मिती आंतर केंद्र नाट्य स्पर्धेत शुक्रवारी (दि. ३०) सकाळच्या सत्रात मुंबई कार्यालयातर्फे महेश एलकुंचवार लिखित ‘प्रतिबिंब’ तर दुपारच्या सत्रात उरण वायु विद्युत केंद्राने रत्नाकर मतकरी लिखित ‘शू... कुठं बोलायचे नाही’ या दोन कथांचे रंगमंचावर सादरीकरण केले.

महानिर्मिती  राज्य नाट्य स्पर्धा

नाशिक : महानिर्मिती आंतर केंद्र नाट्य स्पर्धेत शुक्रवारी (दि. ३०) सकाळच्या सत्रात मुंबई कार्यालयातर्फे महेश एलकुंचवार लिखित ‘प्रतिबिंब’ तर दुपारच्या सत्रात उरण वायु विद्युत केंद्राने रत्नाकर मतकरी लिखित ‘शू... कुठं बोलायचे नाही’ या दोन कथांचे रंगमंचावर सादरीकरण केले.महाकवी कालिदास कलामंदिरमध्ये सोमवार पासून सुरू असलेल्या अंतर केंद्र नाट्य स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात मुंबई कार्यालयातर्फे मानवी मनाचा शोध घेणारे ‘प्रतिबिंब’ नाटक सादर करण्यात आले.या नाटकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. दैनंदिन जीवनात स्वत्व हरवलेल्या तो, ती आणि ते या सर्वांची ही कथा या नाटकांमधून दिग्दर्शक संतोष पुरोहित यांनी रंगमंचावर सादर करण्याचा प्रयत्न केला. या नाटकात मयुरी शिंदे, सचिन मोडकवार, अंजली कुलकर्णी बावटे, दिलीप राजपूूत आदींच्या भूमिका असून, प्रकाशयोजना प्रफुल्ल कुलकर्णी, संगीत नितीन जोगळेकर, रंगभूषा व वेशभूषा गीतांजली झीरमुट यांनी केली होती, तर दुपारच्या सत्रात उरण येथील वायू विद्युत केंद्रातर्फे रत्नाकर मतकरी लिखित ‘शू... कुठं बोलायचे नाही’ नाटकातून दिग्दर्शक अनिल शिंदे यांनी नितिमत्ता शुद्ध आचरण, सुसंस्कृत पणाच्या गप्पा मारणाऱ्यांकडून घडलेली एखादी अयोग्य कृती म्हणजे काहीतरी भयंकर घडलेले आहे असे न भासवता आणि काही घडलेलेच नाही, अशा आविर्भावात वावरताना अशी घटना प्रसंग समाजासमोर येऊ न देण्यासाठी करावी लागणारी धडपड या नाटकातून रंगमंचावर रंगवलेली आहे.नाटकात अनिल शिंदे, प्रशांत भट, जगन्नाथ कचरे, प्रियांका पाटील, रुपाली चव्हाण, पूनम लामतुरे यांनी भूमिका साकारली असून, नेपथ्य सुनील इंगळे, सागर मार्कं ड यांचे असून, संगीत प्रशांत काकड व धनंजय मंडलिक, प्रकाशयोजना वसंत स्वामी व शीतल टारे यांचे आहे.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक