शहरात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 12:58 AM2021-05-03T00:58:19+5:302021-05-03T00:58:43+5:30

मागील चार दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस पडत असून रविवारी (दि.२) काही भागात दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. कोरोनामुळे बाजार बंद असला तरी वाळवणाच्या कामात व्यस्त असलेल्या गृहिणींची मात्र धावपळ उडाली. वातावरणात झालेला बदल आणि पावसाची हजेरी यामुळे सायंकाळनंतर शहरात थंड वारे वाहू लागल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

The presence of unseasonal rains in the city again | शहरात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी

रविवारी (दि.२) पुन्हा झालेल्या अवकाळी पावसामुळे वडाळा चौफुलीजवळील भागात अशा प्रकारे पाणी साचले होते.

Next
ठळक मुद्देवीजपुरवठा खंडित : सायंकाळी पसरला गारठा

नाशिक : मागील चार दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस पडत असून रविवारी (दि.२) काही भागात दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. कोरोनामुळे बाजार बंद असला तरी वाळवणाच्या कामात व्यस्त असलेल्या गृहिणींची मात्र धावपळ उडाली. वातावरणात झालेला बदल आणि पावसाची हजेरी यामुळे सायंकाळनंतर शहरात थंड वारे वाहू लागल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला. दुपारनंतर पंचवटी, सिडको, सातपूरसह इतर उपनगरांमध्ये पावसाचे वातावरण तयार झाले होते.  तर वडाळा येथे बऱ्यापैकी पाऊस झाल्याने चौकांमध्ये पाण्याचे तळे साचले होते.
नाशिकरोडला रिमझिम
रविवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत अधून मधून पावसाची रिमझिम सुरू होती. यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. तसेच विजेचा लपंडावदेखील सुरू होता. गेल्या चार दिवसांपासून नाशिकरोड परिसरामध्ये अवकाळी पावसाचे आगमन होत असल्याने सर्वांची धांदल उडत असून, मोठी गैरसोय होत आहे. 

Web Title: The presence of unseasonal rains in the city again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.