सिन्नर तालुक्यात पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:29 IST2021-09-02T04:29:44+5:302021-09-02T04:29:44+5:30

सिन्नर : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे सोमवारी (दि.३०)रात्री आगमन झाले. शहरासह तालुक्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. ...

Presence of rains in Sinnar taluka | सिन्नर तालुक्यात पावसाची हजेरी

सिन्नर तालुक्यात पावसाची हजेरी

सिन्नर : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे सोमवारी (दि.३०)रात्री आगमन झाले. शहरासह तालुक्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या.

यावर्षी सिन्नर तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिले आहे. देवनदी, शिवनदी, सरस्वती नदी अद्याप प्रवाही झालेल्या नाहीत. म्हाळुंगी नदीचे पाणीही अद्याप भोजापूर धरणात पोहोचले नाही.

पूर्व भागातील पाण्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. अशावेळी पावसाचे आगमन झाल्याने खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र अद्याप विहिरींना पाणी उतरेल असा चांगला पाऊस न झाल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहेत.

सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी झालेल्या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन आदी खरिपाच्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. यावर्षी महिनाभर उशिराने आलेल्या पावसाने पेरण्याही लांबल्या होत्या. पेरण्या झाल्यानंतर पावसाने पुन्हा पाठ फिरविल्याने बळीराजा चिंतातुर झाला होता.

मात्र सोमवारपासून पावसाचे काही प्रमाणात का होईना पुनरागमन झाल्याने खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. नदी-नाले प्रवाहित नसल्याने शेतकऱ्यांसह सारेच जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र सिन्नर तालुक्यात आहे.

Web Title: Presence of rains in Sinnar taluka