नांदूरशिंगोटे परिसरात पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST2021-09-13T04:14:09+5:302021-09-13T04:14:09+5:30

नांदूरशिंगोटे परिसरातील मानोरी, कणकोरी, मऱ्हळ, निऱ्हाळे, सुरेगाव, दोडी, खंबाळे, माळवाडी, दापूर, चापडगाव, धुळवड, गोंदे तसेच भोजापूर खोऱ्यातील चास, नळवाडी, ...

Presence of rain in Nandurshingote area | नांदूरशिंगोटे परिसरात पावसाची हजेरी

नांदूरशिंगोटे परिसरात पावसाची हजेरी

नांदूरशिंगोटे परिसरातील मानोरी, कणकोरी, मऱ्हळ, निऱ्हाळे, सुरेगाव, दोडी, खंबाळे, माळवाडी, दापूर, चापडगाव, धुळवड, गोंदे तसेच भोजापूर खोऱ्यातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी आदी भागात कमी-अधिक प्रमाणात दिवसभर पावसाने हजेरी लावली. आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर गणेश चतुर्थीपासून सलग तीन दिवस संततधार तथा भीज पाऊस सुरू आहे. अधुनमधून कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत आहे. दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण तयार होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतीकामांना ब्रेक दिला तर पावसाच्या रिपरिपीमुळे नागरिकांनी घरी थांबणे पसंत केले. कधी हलका तर कधी मध्यम तर अचानक मुसळधार पाऊस येत असल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले होते. सखल भागात पाण्याचे तळे साचल्याने पाण्यातून वाट काढावी लागली. तसेच चिखलामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दिवसभर सुरू असलेल्या पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाची सरासरी कमी आहे. सर्वच नक्षत्रात कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र अद्यापही परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने बंधारे, पाझर तलाव, केटीवेअर कोरडेठाक आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांना पिके वाचवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तसेच यावर्षी भाजीपाला पिकांना भाव मिळत नसल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

Web Title: Presence of rain in Nandurshingote area