शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

निºहाळे फत्तेपूर परिसरात मृगाच्या पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 17:48 IST

निºहाळे : सिन्नर तालुक्यातील निºहाळे फत्तेपूर परिसरातील पूर्व भागात मृगाच्या पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. परिसरात पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्दे. तालुक्यात दररोजच पावसाचे वातावरण निर्माण होत होते.

निºहाळे : सिन्नर तालुक्यातील निºहाळे फत्तेपूर परिसरातील पूर्व भागात मृगाच्या पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. परिसरात पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक शेतकरी, व्यापारी नागरिकांचेही सारे गणितच कोलमडले आहे. तालुक्यात दररोजच पावसाचे वातावरण निर्माण होत होते. रोहिणी नक्षत्र संपले तरी पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अखेर मृगाच्या पावसाची हजेरी लावल्याने पावसाने सुरुवात केली आहे. रात्रभर भीज पाऊस झाल्याने शेती भुसभुशीत होऊन जमिनीत पाणी साचून राहिले आहे.पाऊस पडता झाल्याने मशागतीच्या कामाला वेग आला आहे. सिन्नर, वावी, नांदूर शिंगोटे आदी बाजार पेठेत खते, बियाणे खरेदीसाठी शेतकरी गर्दी करू लागले असून, पुन्हा एकदा शिवार मजुरांनी गजबजून गेला आहे.हवामान खात्याने पुढील दोन तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकरी खरीप हंगामातील पेरणी पूर्व मशागतीत व्यस्त झाला आहे. सर्वत्रच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, शेतीच्या कामासाठी मजूरवर्गाची टंचाई भासू लागली आहे, मात्र त्याही परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत शेतकरी मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग, कपाशी, भाजीपाला, टोमॅटो आदी लागवडीच्या कामांमध्ये व्यस्त झाला आहे.पूर्वी शिवारात सर्जा-राजाच्या ललकारीचा घुमणारा आवाज आता लुप्त झाला असून, यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागतीला प्राधान्य दिले जात असल्याने कमी श्रमात, कमी वेळात मशागत होत असल्याने सध्या सर्वच भागात मशागतीच्या कामांना वेग आल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस