खंडेराव महाराज यात्रेची तयारी सुरू
By Admin | Updated: December 6, 2015 22:28 IST2015-12-06T22:27:46+5:302015-12-06T22:28:20+5:30
खंडेराव महाराज यात्रेची तयारी सुरू

खंडेराव महाराज यात्रेची तयारी सुरू
ओझर : येथे सालाबादप्रमाणे खंडेराव महाराज यात्रोत्सवास १७ डिसेंबरपासून सुरुवात होत असून, ग्रामपालिकेने यात्रोत्सवाची तयारी सुरू केली आहे. यात्रा मैदान, परिसराची स्वच्छता करण्यात आली असून, विद्युत रोषणाईचे कामही प्रगतिपथावर आहे. यात्रोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी आमदार माईसाहेब कदम, यतिन कदम, सरपंच जान्हवी कदम, उपसरपंच शुभांगी भडके, सदस्य सागर शेजवळ, मधुरा कदम, चंदा गवळी, रज्जाक मुल्ला, बाजीराव सताळे, विद्या शिंदे, आशा शेटे, गिरिजाकांत वलवे यांच्या प्रमुख उपस्थितीत यात्रा समिती सल्लागार मंडळाची निवड करण्यात आली. यात्रोत्सवात मानाचे बारागाडे, कुस्ती स्पर्धा, तमाशे फड, रहाटपाळणे आदि कार्यक्रम होणार असल्याची माहिती यात्रा समितीने दिली आहे. यात्रोत्सवात धुळीच्या नियंत्रणासाठी पाण्याचा वापर, पिण्याचे पाणी, स्वच्छता याबाबत ग्रामपालिका लक्ष देणार आहे़ नागरिकांनी यात्रोत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन यात्रा समितीने केले आहे. (वार्ताहर )