शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

बांगलादेशकडून कांदा आयातीस परवाना देण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:10 IST

लासलगाव येथे बुधवारी दिवसभरात १८ हजार ३०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा लिलाव होऊन ८०० ते २२०० रुपये व ...

लासलगाव येथे बुधवारी दिवसभरात १८ हजार ३०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा लिलाव होऊन ८०० ते २२०० रुपये व सरासरी १८५० रुपये बाजारभाव राहिला. मंगळवारी (दि.१) दिवसभरात २५ हजार ९०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा लिलाव होऊन ६०० ते २१५२ व सरासरी १८०० रुपये भाव राहिला. गत सप्ताहात लासलगाव मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची १ लाख १६ हजार २०५ क्विंटल आवक होऊन बाजारभाव किमान ६००, कमाल २०२१ तर सर्वसाधारण १५७६ रुपये प्रतिक्विंटल होते. दरम्यान,

जिल्ह्यातील दिंडोरी व वणी बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक होत असून खरीप हंगामासाठी शेतकरी वर्गाला यंदा कांदा आधार देणार, असे चित्र दिसत आहे. दिंडोरी व वणी बाजार समितीत मे महिन्यात जवळपास ८० हजार ३६७ क्विंटल कांद्याची आवक झाली, तर बाजारभाव साधारणपणे

७७८ ते २१७२ रुपये व सरासरी १४५० रुपये इतके राहिले. यापुढेही कांद्याला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

इन्फो

पिंपळगावी २५०० रुपये भाव

पिंपळगाव बसवंत येथील बाजार समिती आवारातही कांद्याची ९९८ वाहनांतून चांगली आवक होऊन बाजारभाव किमान १००० ते कमाल २५०० रुपये आणि सरासरी १७५१ रुपये राहिले. गोलटी कांद्याला ४०० ते १५०० रुपये व सरासरी १२०० रुपये भाव मिळाला. नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याला किमान १९९० व कमाल २१९० तर सरासरी २०८० रुपये भाव मिळाला.

इन्फो

निर्यातीसाठी अर्ज मागवले

बांगलादेश सरकारने कांदा आयातीकरिता निर्यातदारांकडून अर्ज मागविले आहेत. पश्‍चिम बंगालप्रमाणेच बांगलादेशमधील कांद्याची आवक संपुष्टात आल्याने आता नवीन कांद्याची आवक सुरू होईपर्यंत भारतीय कांद्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. बांगलादेशमध्ये दिवसाला सर्वसाधारणपणे एक हजार टनांच्या आसपास कांद्याची निर्यात होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशासह विदेशात लॉकडाऊन असतानाही देशातून एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत कांद्याची १४ लाख ०४ हजार मे. टन इतकी निर्यात झाली असून, कांदा निर्यातीतून २४३४ कोटी रुपयांची उलाढाल होत केंद्र सरकारला कोरोनाकाळात चांगलेच परकीय चलन मिळाले आहे.