लष्करी सेवेसाठी तयारी करावी : अनिरुद्ध देव
By Admin | Updated: February 27, 2017 00:14 IST2017-02-27T00:14:36+5:302017-02-27T00:14:52+5:30
लष्करात सेवा करायची असेल तर त्यासाठी विद्यार्थी-दशेपासूनच तयारी करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन ब्रिगेडीयर अनिरुद्ध देव यांनी केले.

लष्करी सेवेसाठी तयारी करावी : अनिरुद्ध देव
देवळाली कॅम्प : लष्करात सेवा करायची असेल तर त्यासाठी विद्यार्थी-दशेपासूनच तयारी करणे गरजेचे आहे. मानसिक तयारी, शारीरिक क्षमता व शैक्षणिक पात्रता निर्माण करीत लष्करात सहज सेवा करण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन ब्रिगेडीयर अनिरुद्ध देव यांनी केले. लॅमरोड येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात ‘भविष्यातील नोकरीच्या संधी’ या विषयावर आयोजित व्याख्यानात देव यांनी विद्यार्थ्यांना लष्करातील विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच लष्करात दाखल होण्यासाठी ज्या परीक्षा व पात्रता लागतात याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय मेधने व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विलास सैदपाटील, प्रा. स्वाती सिंग आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एन. एम. पवार व आभार प्रा. डॉ. उर्मिला गिते यांनी केले. (वार्ताहर)