त्र्यंबक तालुक्यात नवरात्रोत्सवाची तयारी
By Admin | Updated: October 12, 2015 23:08 IST2015-10-12T23:06:53+5:302015-10-12T23:08:00+5:30
त्र्यंबक तालुक्यात नवरात्रोत्सवाची तयारी

त्र्यंबक तालुक्यात नवरात्रोत्सवाची तयारी
विविध कार्यक्रम : तरुणाईच्या उत्साहाला उधाणत्र्यंबकेश्वर : शहरासह तालुक्यात नवरात्राची सर्वत्र धूम राहणार असून, अबालवृद्ध व तरुणाईच्या उत्साहाला जणू उधाण आले आहे. गावागावांत श्रद्धास्थान असलेल्या देवी भगवतीच्या मंदिरांत मंगळवारपासून नवरात्रोत्सवासनिमित्त भाविकांची गर्दी दिसून येणार आहे.
तालुक्यातील त्र्यंबकेश्वरमधील देवी मंदिरे, गडदवणे येथील गडदुगेमाता आदिंसह देवी मंदिरे प्रसिद्ध आहेत. शहरात आमावस्याच्या दिवशी घरात लागणाऱ्या सामानाची खरेदी करण्यासाठी येथील गंगास्लॅबवर गर्दी झाली होती, तर कुंभारबांधवांनी घट विकण्यासाठी गर्दी केली होती. नवरात्रोत्सवामध्ये गरबा, टिपऱ्या खेळण्यासाठी मंडळांतर्फे मोठमोठे राऊंड तयार करण्यात आले आहे, तसेच आकर्षक मंडपांची उभारणी करण्यात आली असून, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बाजारात देवीच्या मूर्ती दाखल झाल्या असून, अनेकांनी मूर्ती घेण्यासाठी गर्दी केली आहे. अनेक मंडळांकडून देवीच्या मूर्तीची गावातून मिरवणूक निघणार आहे त्यानंतर स्थापना करण्यात येणार आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त त्र्यंबक पोलिसांनी शहरात बंदोबस्त लावला आहे. गरबा खेळण्यासाठी रात्री १0 पर्यंतच वेळ ठेवण्यात आली आहे. मात्र शेवटच्या दिवसासाठी ही वेळ (स्थानिक पोलीस निरीक्षक यांच्या सौजन्याने) शिथिल करण्यात येईल, असे समजते. दरम्यान, मंडळांत तरुणांकडून गोंधळ झाल्यास त्यांची गय केली जाणार नाही असे पोलीस निरीक्षक देवीदास पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)