इच्छुकांकडून मनपा निवडणुकीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:30 IST2020-12-13T04:30:33+5:302020-12-13T04:30:33+5:30
जॉगिंग ट्रॅक झाल्याने नागरिकांमध्ये समाधान नाशिक : गांधीनगर येथील फुटबॉल मैदानावर जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यात आल्याने नागरिकांची चांगली सोय ...

इच्छुकांकडून मनपा निवडणुकीची तयारी
जॉगिंग ट्रॅक झाल्याने नागरिकांमध्ये समाधान
नाशिक : गांधीनगर येथील फुटबॉल मैदानावर जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यात आल्याने नागरिकांची चांगली सोय झाली आहे. ट्रॅक झाल्यामुळे सकाळी व सायंकाळी या ठिकाणी फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे संरक्षक भिंत बांधल्याने या ठिकाणी रात्रीच्या वेळी जमणाऱ्या मद्यपींना आळा बसला आहे. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
ढगाळ वातावरणामुळे ग्रामीण भागात चिंता
नाशिक : शहरासह ग्रामीण भागात मागील दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. ढगाळ वातावरणामुळे गव्हावर रोग पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर कांदा रोपावरही त्याचा परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.