गणेशमूर्ती स्टॉल्सची तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:57 IST2017-08-11T00:57:32+5:302017-08-11T00:57:41+5:30

अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सार्वजनिक मंडळांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच श्री गणरायाच्या मूर्ती विक्रीचे स्टॉल्स ठिकठिकाणी थाटण्यात आले असून, आरास, देखाव्याचे साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.

Preparations for Ganesh idol stalls | गणेशमूर्ती स्टॉल्सची तयारी सुरू

गणेशमूर्ती स्टॉल्सची तयारी सुरू

नाशिकरोड : अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची सार्वजनिक मंडळांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. तसेच श्री गणरायाच्या मूर्ती विक्रीचे स्टॉल्स ठिकठिकाणी थाटण्यात आले असून, आरास, देखाव्याचे साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.
अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचे सर्वांना वेध लागले असून, बाजारामध्ये ठिकठिकाणी छोट्या-मोठ्या गणरायाच्या मूर्ती विक्रीचे स्टॉल्स थाटण्यात आले आहे. घरगुती श्री गणरायाच्या देखाव्यासाठी विविध प्रकारचे थर्माकोलचे मंदिर, आकर्षक विद्युत माळा, प्लॅस्टिकच्या रंगीबेरंगी फुलांच्या माळा आदी शोभिवंत वस्तू विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. तसेच मराठी, हिंदी गाण्यांच्या नवीन सीडी, कॅसेटदेखील आल्या आहेत.

Web Title: Preparations for Ganesh idol stalls