शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

विधान परिषदेसाठी नपाच्या आडून तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 1:48 AM

येत्या मे-जून २०१८ मध्ये होऊ घातलेल्या नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून, शिवसेनेने तर अप्रत्यक्षरीत्या आपल्या उमेदवाराची सहा महिन्यांपूर्वीच घोषणा करीत भाजपावर कुरघोडीची संधी सोडलेली नाही. याउलट शिवसेनेनंतर सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपाने आपली पावले जपून टाकण्यास सुरुवात केली आहे. डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या इगतपुरी व त्र्यंबकेश्वरच्या निवडणुकीनंतरच या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याचे समजते.

ठळक मुद्देनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले गुप्त मतदानामुळे ही निवडणूक मागील वेळी चांगलीच गाजली नगरपंचायतींच्या सर्वपक्षीय नगरसेवकांना दिवाळी भेट

गणेश धुरी।नाशिक : येत्या मे-जून २०१८ मध्ये होऊ घातलेल्या नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून, शिवसेनेने तर अप्रत्यक्षरीत्या आपल्या उमेदवाराची सहा महिन्यांपूर्वीच घोषणा करीत भाजपावर कुरघोडीची संधी सोडलेली नाही. याउलट शिवसेनेनंतर सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपाने आपली पावले जपून टाकण्यास सुरुवात केली आहे. डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या इगतपुरी व त्र्यंबकेश्वरच्या निवडणुकीनंतरच या मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी करण्याचा निर्णय भाजपाने घेतल्याचे समजते.  स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नाशिक व मालेगाव महापालिकेचे तसेच नगरपंचायतींचे नगरसेवक तसेच जिल्हा परिषद सदस्य हे मतदार असून, गुप्त मतदानामुळे ही निवडणूक मागील वेळी चांगलीच गाजली होती.  शिवसेनेचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी राष्टÑवादीचे विद्यमान आमदार जयंत जाधव यांची चांगलीच दमछाक करीत शेवटी चिठ्ठीच्या नशिबाने कौल मिळवित जाधव यांना विजय मिळवावा लागला होता. त्यावेळी संख्याबळ सर्वाधिक असूनही राष्टÑवादी व कॉँग्रेसची मते फुटल्याची चर्चा होती. आताही या मतदारसंघात विजय मिळविण्याच्या दृष्टीने शिवसेनेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती झालेले खासदार संजय राऊत यांनी शासकीय विश्रामगृहावर अनौपचारिक बैठक घेत जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांची अप्रत्यक्षरीत्या शिवसेनेकडून स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार म्हणून घोषणाही केल्याची चर्चा आहे. नरेंद्र दराडे यांनीही दिवाळीत जिल्हा परिषद सदस्य तसेच नगरपंचायतींच्या सर्वपक्षीय नगरसेवकांना दिवाळी भेट म्हणून पैठणी व मिठाईचे वाटप केल्याचे समजते. तर भाजपाकडून राष्टÑवादीचे एक आयात उमेदवार किंवा केदा अहेर, प्रकाश नन्नावरे यांची नावे चर्चेत आहेत. राष्टÑवादी कॉँगे्रेसकडून अद्याप उमेदवारी निश्चित झालेली नसली तरी विद्यमान आमदार जयंत जाधव हे पुन्हा लढण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्टÑवादी कॉँग्रेसकडून माजी खासदार देवीदास पिंगळे किंवा माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पैकी एक उमेदवार होऊ शकतो. तूर्तास भाजपाचे वेट अ‍ॅन्ड वॉच शिवसेनेसाठी निर्णायक आहे. तिकडे प्रसाद लाड यांना शिवसेनेने समर्थन दिल्याने नाशिकला शिवसेनेला भाजपाने समर्थन दिल्यास राष्टÑवादी व कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो. तूर्तास ही सर्व जर-तरची गणिते असून, डिसेंबरनंतरच या निवडणुकीच्या तयारीला वेग येणार आहे.असे आहे पक्षीय बलाबल (इगतपुरी व त्र्यंबकेश्वर वगळून)शिवसेना- १८७, भाजपा- १५१, राष्टÑवादी कॉँग्रेस- ९६, कॉँग्रेस- ७०, शहर विकास आघाडी (देवळा व सटाणा)- १९, मनसे- ०६, आरपीआय- ०४, जनशक्ती (देवळा)- ०३, अपक्ष- ३४, बहुजन समाजवादी पार्टी- ०१, जनता दल- ०६, एमआयएम- ०७, माकप- १३ (इगतपुरी- १९, त्र्यंबकेश्वर- १७) असे एकूण- ६३३ मतदारांची संख्या आहे.  

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliticsराजकारण