Preparation for Khanderao Maharaj Yatra in final stage | खंडेराव महाराज यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात
  यात्रेनिमित्त नव्याने तयार केलेला श्री खंडोबा महाराजांचा रथ.  

ठळक मुद्दे बुधवारी (दि.११) सायंकाळी ४ वाजता रथ मिरवणूक व बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्र म होणार आहे. यानिमित्त होणाºया कुस्त्यांच्या दंगलीत जिल्ह्यातील पहिलवानांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. रात्री रहाडी व नवसपूर्तीचा तमाशा होणार आहे


.

पिंपळगाव बसवंत : परिसरातील शिरसगाव येथील श्री खंडेराव महाराज यांच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे येथील गावकऱ्यांच्या वतीने यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.. पहाटे लंगर तोडण्याचा कार्यक्रम होऊन यात्रेची सांगता होणार आहे. त्यामुळे या सार्वजनिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्र माला भाविकांनी हजेरी लावून यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन यात्रा कमिटी कडून करण्यात आले आहे. शिरसगाव खंडेराव महाराज यात्रेनिमित्त मानाचा रथ दत्तात्रय भडांगे, भारत भडांगे व किरण भडांगे हे या रथाचे मानकरी असल्याने यांनी पूर्णपणे नवीन रथ तयार केला आहे. या रथाचे काम शिरसगाव येथील गणेश शिरसाठ यांनी केले आहे.

Web Title:  Preparation for Khanderao Maharaj Yatra in final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.