जिल्ात ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी मतदार याद्यांची प्रसिद्धी : जूनमध्ये मतदान
By Admin | Updated: May 13, 2014 00:11 IST2014-05-13T00:01:41+5:302014-05-13T00:11:59+5:30
नाशिक : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच जुलै ते डिसेंबर यादरम्यान मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून, त्यासाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर मतदारांच्या हरकती मागविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्याच मतदार याद्या ग्रा धरण्याचे आयोगाने ठरविल्याने त्यात नवीन मतदारांचा समावेश अजिबात केला जाणार नाही.

जिल्ात ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी मतदार याद्यांची प्रसिद्धी : जूनमध्ये मतदान
नाशिक : लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही तोच जुलै ते डिसेंबर यादरम्यान मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून, त्यासाठी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करून त्यावर मतदारांच्या हरकती मागविण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्याच मतदार याद्या ग्रा धरण्याचे आयोगाने ठरविल्याने त्यात नवीन मतदारांचा समावेश अजिबात केला जाणार नाही.
आगामी तीन महिन्यांत पुन्हा विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होणार असल्याने, तत्पूर्वी जुलै ते डिसेंबर या काळात पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणार्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पाडून घेण्याची तयारी आयोगाने सुरू केली आहेे. जुलै महिन्यात काही ग्रामपंचायतींची मुदत संपणार असल्याने साधारणत: जूनमध्येच मतदान घेण्याचा आयोगाचा इरादा असून, त्यासाठी येत्या २० मेपासूनच ज्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे तेथे प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी वापरल्या गेलेल्या मतदार याद्याच त्यासाठी ग्रा धरण्यात येणार आहेत; परंतु प्रभागनिहाय जाहीर होणार्या याद्यांबाबत कोणाच्या काही हरकती वा सूचना असतील त्या त्यांनी तहसिलदारांकडे नोंदवायच्या आहेत. या हरकतींमध्ये नवीन मतदाराचे नाव यादीत समाविष्ट केले जाणार नाही, फक्त नावातील बदल, प्रभागात बदल अशा जुजबी दुरुस्ती मतदार याद्यांमध्ये केल्या जातील त्यासाठी मात्र मतदाराला लिखीत स्वरूपात हरकती नोंदवाव्या लागणार आहेत. २६ मेपर्यंत या हरकती स्वीकारण्यात येणार असून, ३० मेपर्यंत हरकतींची सुनावणी करून, त्याच दिवशी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
नाशिक जिल्ातील ७६ ग्रामपंचायतींची या काळात मुदत संपुष्टात येत असून, त्यात इगतपुरी- ३८, निफाड- २१, नाशिक- ३, त्र्यंबक- ३, कळवण- १० व मालेगाव तालुक्यातील एक ग्रामपंचायत आहे. राज्य आयोगाच्या सूचना प्राप्त होताच, जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.