व्यसनांतून मुक्तीसाठी पाच हजार लोकांची तयारी
By Admin | Updated: August 28, 2015 23:47 IST2015-08-28T23:46:37+5:302015-08-28T23:47:30+5:30
व्यसनांतून मुक्तीसाठी पाच हजार लोकांची तयारी

व्यसनांतून मुक्तीसाठी पाच हजार लोकांची तयारी
नाशिक : मनुष्याच्या जीवनात वाढत्या ताणतणावामुळे व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढले असून, यापासून सुटका करण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने सुरू असलेल्या साधुग्राममधील व्यसनमुक्ती शिबिरात सुमारे पाच हजार लोकांनी आतापर्यंत नावनोंदणी केली आहे.
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने व्यसनमुक्तीचा प्रसार करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. शरीर हे आत्म्याचे मंदिर असून, त्यात विष कालवू नका, असा संदेश देत ‘माझा भारत व्यसनमुक्त भारत’ असे व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येत असून, यासाठी साधुग्राममध्ये औरंगाबाद रोडवर मिर्ची हॉटेल चौफुलीसमोरच ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचा तंबू असून, याठिकाणी दारू, सिगारेट, तंबाखू, गुटका आदि व्यसनांपासून
होणारे दुष्परिणाम दाखविण्यासाठी चित्ररूप व मूर्तीरूप प्रदर्शन मांडले आहे. (प्रतिनिधी)