नाशिकमध्ये प्रेमीयुगलाची आत्महत्त्या
By Admin | Updated: July 26, 2016 15:38 IST2016-07-23T22:50:37+5:302016-07-26T15:38:50+5:30
इगतपुरी तालुक्यातील तळोघ येथील एका तरुण प्रेमीयुगलाने फेटयाच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

नाशिकमध्ये प्रेमीयुगलाची आत्महत्त्या
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २३ - इगतपुरी तालुक्यातील तळोघ येथील एका तरुण प्रेमीयुगलाने फेटयाच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्याजवळील तळोघ येथील गावातील मंगल हरी गोईकणे ( वय १६ ) व प्रविण कीसन कडु ( वय २२ ) यांनी भरदुपारी दिड वाजेच्या सुमारास मुलाच्याच राहात्या घरातील खोलीत आडव्या खांबाला फेट्याच्या दोऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या मुलीची शोधाशोध सुरु असतांना मुलाचे घर आतुन बंद अवस्थेत आढळले. मात्र भरपुर आवाज देऊनही काणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर घरावर चढुन छतावरील काही कौले काढून आत प्रवेश मिळविला असता दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.
दरम्यान या दोघाच्या अंगावर चाकुच्या सहायाने वार असल्याचेही आढळले असुन या दोघांचे इगतपुरीच्या शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आले इगतपुरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आसून तर रात्री उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते.
या घटनेचा अधिक तपास पोलीस उपअधिक्षक दत्तात्रय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश मांडवे, उपनिरीक्षक सुभाष पाटील,गणेश वराडे, अशोक भाबड पी.एन.गंगावणे,पी.एन. गांगुडें,एच.सी.बोराडे आदी करत आहे.