संमेलनाच्या स्वयंसेवक समितीची प्राथमिक बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:14 IST2021-02-12T04:14:42+5:302021-02-12T04:14:42+5:30

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी सुरू झाली असून, स्वयंसेवक समितीची प्राथमिक बैठक गुरुवारी (दि. ११) ...

Preliminary meeting of the meeting volunteer committee | संमेलनाच्या स्वयंसेवक समितीची प्राथमिक बैठक

संमेलनाच्या स्वयंसेवक समितीची प्राथमिक बैठक

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी सुरू झाली असून, स्वयंसेवक समितीची प्राथमिक बैठक गुरुवारी (दि. ११) गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणातील कुसुमाग्रज नगरीत समितीचे अध्यक्ष आणि संस्कृत भाषा सभा नाशिकचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत पार पडली.

त्यात प्रामुख्याने संपूर्ण संमेलन सूत्रबद्धतेत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वयंसेवकांच्या नियोजनाबाबत चर्चा झाली. त्याचबरोबर साहित्यापासून दूर असलेल्या वर्गाला या प्रक्रियेशी मोठ्या प्रमाणात कसे जोडून घेता येईल आणि स्वयंसेवेबरोबर युवा पिढीवर जास्तीत जास्त चांगले वाङ्मयीन संस्कार कसे होतील, यावरही चर्चा झाली. या बैठकीला विश्वास ठाकूर, दिलीप साळवेकर, सुभाष पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. संतोष मोरे, दीपक पाटील, श्रद्धा कापडणे, वेदांशु पाटील, शुभम शेंडे, भूषण काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Preliminary meeting of the meeting volunteer committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.