शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

मुसळधार : सायंकाळनंतर तीन तासांत ३४.मि.मी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 21:32 IST

शनिवारी सायंकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. मध्यम स्वरूपाच्या वेगवान सरींचा वर्षाव सुमारे पाऊण तास सुरू होता.

ठळक मुद्देसायंकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान मुसळधार दुपारी ४ वाजेनंतर शहरात ढगाळ हवामान सायंकाळी ६ वाजेपासून जोरदार सरी

नाशिक : शहराला परतीच्या पावसाने शनिवारी (दि.५) पुन्हा मेघगर्जनेसह झोडपून काढले. सायंकाळी ६ वाजेपासून सुमारे तासभर चाललेल्या जोरदार पावसाने घरी परतणाऱ्या नोकरदारांसह रस्त्यांवरील विक्रेत्यांची त्रेधातीरपीट उडाली. सायंकाळी तीन तासांत ३४ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली. जून ते सप्टेंबरपर्यंत एकूण १ हजार २३४ मि.मी इतका पाऊस पडला असून गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा शहरासह जिल्ह्यात दुप्पट पाऊस झाला.मागील दोन दिवसांपासून हलक्या सरींचा काही मिनिटे शहरात दुपारनंतर वर्षाव होत होता. गुरुवारपासून पावसाने दोन दिवस विश्रांती घेत शनिवारी सायंकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. मध्यम स्वरूपाच्या वेगवान सरींचा वर्षाव सुमारे पाऊण तास सुरू होता. शहरातील गंगापूररोड, कॉलेजरोड, शरणपूररोड, सीबीएस, रविवारकारंजा, मेनरोड, भद्रकाली, जुने नाशिक, द्वारका, मुंबईनाका, तिडके कॉलनी या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये इंदिरानगर, वडाळागाव, नाशिकरोड, पाथर्डीफाटा, अंबड या भागांतही हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरींचा कमी-अधिक प्रमाणात वर्षाव झाला.शनिवारी दिवसभर प्रखर ऊन शहर व परिसरात पडले होते. यामुळे दुपारपासून वातावरणात कमालीचा उष्मा वाढला होता. नाशिककर घामाघूम झाले होते. दुपारी ४ वाजेनंतर शहरात ढगाळ हवामान तयार होऊन काही प्रमाणात अल्पवेळ थंड वारा सुटल्याने हलकासा दिलासा जाणवला. सायंकाळी ६ वाजेपासून जोरदार सरी कोसळू लागल्याने मात्र नाशिककरांची वाढत्या उकाड्यापासून सुटका झाली. सायंकाळी तासभर सुरू असलेल्या पावसामुळे कालिका देवी यात्रोत्सवात आलेल्या भाविकांची धावपळ उडाली. तसेच विक्रेत्यांचेही हाल झाले. विक्रीसाठी आणलेला विविध प्रकारचा माल आवरताना विक्रेत्यांची दमछाक झालेली दिसून आली. अचानकपणे आलेल्या जोरदार पावसामुळे कालिका यात्रोत्सवात अखेरच्या टप्प्यात होणारी शनिवारच्या सुटीच्या गर्दीवरही परिणाम झाल्याचे जाणवले. तसेच गोदावरीच्या पात्रातही पाणी वाढल्याचे दिसून आले.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊसgodavariगोदावरी