शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनपूर्व सरींनी शहराला झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 00:58 IST

नाशिक : दोन दिवसांपासून वातावरणात वाढणारा उकाडा आणि कमाल तापमानाचा चढता पारा यामुळे नाशिककर घामाघूम झाले होते. रविवारच्या सुटीचा आपापल्या घरात आनंद लुटताना संध्याकाळी मान्सूनपूर्व सरींनी जोरदार हजेरी लावल्याने नाशिककरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. सुमारे अर्धा तास शहरासह उपनगरांमध्ये पाऊस झाला. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १९.४ मि.मी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली.

ठळक मुद्देतीस मिनिटांत १९.४ मि.मी.पर्यंत पाऊस : उपनगरांमध्येही दमदार सलामी

नाशिक : दोन दिवसांपासून वातावरणात वाढणारा उकाडा आणि कमाल तापमानाचा चढता पारा यामुळे नाशिककर घामाघूम झाले होते. रविवारच्या सुटीचा आपापल्या घरात आनंद लुटताना संध्याकाळी मान्सूनपूर्व सरींनी जोरदार हजेरी लावल्याने नाशिककरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. सुमारे अर्धा तास शहरासह उपनगरांमध्ये पाऊस झाला. संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १९.४ मि.मी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली.ढगांच्या गडगडाट अन‌् विजांच्या कडकडाटात पावसाच्या सरींनी रविवारी सलामी दिली. दुपारी चार वाजल्यापासून शहर व परिसरात ढगाळ हवामान तयार होण्यास सुरुवात झाली होती. सायंकाळी पाच वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. शरणपूर रोड, कॉलेज रोड, सिडको, सातपूरसह पंचवटी, नाशिक रोड, इंदिरानगर, गंगापूर रोड भागाला पावसाने झोडपले. रविवारची सुटी आणि कोरोनाचे निर्बंध यामुळे शहरातील रस्त्यांवर तसा शुकशुकाटच होता. नोकरदारांचीही फारशी रेलचेल नव्हती. संध्याकाळी पाच वाजता दमदार सरींचा धुव्वाधार वर्षाव सुरू झाला. ढगांचा गडगडाट अन‌् विजांचा कडकडाटाने शहरवासीय हादरले. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसाने रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. उंच-सखल भागात पावसाचे पाणी साचले होते. स्मार्टसिटीअंतर्गत शहर व परिसरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी त्रेधातिरीपिट उडाल्याचे दिसून आली. कामगारांना हातातील काम सोडून आडोशाला जावे लागले.---इन्फो--तापमानाचा पारा ३४ अंश तर आर्द्रता ९८ टक्केरात्री उशिरापर्यंत काही उपनगरांमध्ये तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातसुद्धा हलक्या सरींचा वर्षाव सुरुच होता. तसेच ढगाळ हवामानही कायम होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचा अनुभव नाशिककरांना आला असला तरी कमाल तापमानाचा पारा शहरात रविवारी ३४.४ अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद झाली. यासोबतच संध्याकाळी वातावरणात आर्द्रतेचेही प्रमाण वाढलेले दिसून आली. ९८ टक्के इतकी आर्द्रता मोजली गेली.पुढील चार दिवस सरींची शक्यताभारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेला अंदाज खरा ठरला. मान्सूनपूर्व सरींनी शहरासह ग्रामीण भागाला शनिवार व रविवारी झोडपून काढले. येत्या १० जूनपर्यंत कोकणात मान्सून प्रवेश करणार आहे. पुढील चार दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व सरींचा वर्षाव होण्याची शक्यता वर्तविली गेली आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस