सैन्यदलातील जवान प्रशांत वाघ यांचे निधन

By Admin | Updated: August 1, 2016 00:19 IST2016-08-01T00:18:50+5:302016-08-01T00:19:06+5:30

सैन्यदलातील जवान प्रशांत वाघ यांचे निधन

Prashant Wagh of the army's army died | सैन्यदलातील जवान प्रशांत वाघ यांचे निधन

सैन्यदलातील जवान प्रशांत वाघ यांचे निधन


ठेंगोडा : येथील भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले जवान प्रशांत विठ्ठल वाघ (३२) यांचे ठेंगोडा येथे अकस्मित निधन झाले. बरेली (उत्तर प्रदेश) येथे शिपाई पदावर कार्यरत असलेले प्रशांत बारा वर्षांपासून सैन्यदलात देशसेवा करीत होते. तीन दिवसांपूर्वीच ते सुट्टी काढून ठेंगोडा येथे घरी आई-वडिलांना भेटण्यासाठी आले होते.
काल रात्री अचानक पोटात दुखायला लागल्याने त्यांना उपचारासाठी सटाणा येथे नेण्यात आले. तिथे डॉँक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. सटाणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रविवारी त्याच्या पार्थिवावर अत्यस्ंस्कार करण्यात आले. अविवाहित असलेले प्रशांत आतिशय मितभाषी व सोज्वळ मनाचा होते. त्याच्या अकस्मिक मृत्यूची वार्ता गावात धडकताच शोक व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशांत यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. येथील ठेंगोडा ग्रामपंचायतीचे वसुली कारकून प्रवीण वाघ यांचे ते बंधू होत. (वार्ताहर)

Web Title: Prashant Wagh of the army's army died