प्रशांत दामले वर्षभरानंतर नाशिकमध्ये
By Admin | Updated: August 7, 2015 22:52 IST2015-08-07T22:52:00+5:302015-08-07T22:52:41+5:30
प्रशांत दामले वर्षभरानंतर नाशिकमध्ये

प्रशांत दामले वर्षभरानंतर नाशिकमध्ये
नाशिक : वर्षभरापूर्वी रंगमंचावरून एक्झिट घेणाऱ्या प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले यांचे नाशिकच्या रंगमंचावर पुनरागमन होत असून, नाशिकमध्ये प्रयोगासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुमारे वर्षभरापूर्वी प्रशांत दामले यांनी टीव्हीवर मालिका करीत असल्याने पुढील दोन वर्षे नाट्यप्रयोग थांबवत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांना त्यांचा प्रत्यक्ष अभिनय पाहता आला नव्हता. ही मालिका संपल्यानंतर दोन महिन्यांपासून दामले यांनी रंगमंचावर पुनरागमन केले आहे. मुंबई, पुण्यातील काही प्रयोगांनंतर दामले हे येत्या रविवारी नाशिकमध्ये ‘कार्टी काळजात घुसली’ या नाटकाच्या निमित्ताने येथील रंगमंचावर पुनरागमन करीत आहेत. या नाटकात प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री तेजश्री प्रधानही यानिमित्त नाशिकमध्ये प्रथमच रंगभूमीवर दिसणार आहे. (प्रतिनिधी)
नाशिकचे प्रेक्षक दर्दी आणि अभ्यासू
नाशिकचे प्रेक्षक अत्यंत दर्दी व अभ्यासू असल्याने येथे नाटक करण्यासाठी आपण नेहमी उत्सुक असतो, असे मत प्रशांत दामले यांनी व्यक्त केले आहे, तर पूर्वी स्वाती चिटणीस साकारत असलेली भूमिका करायला मिळत असल्याबद्दल तेजश्री प्रधाननेही आनंद व्यक्त केला आहे. सुमारे वर्षभरानंतर येथे प्रयोग करताना मला पूर्वी सारखाच प्रतिसाद मिळेल.