महिलेच्या प्रसंगावधानाने वाचले हरणाचे प्राण

By Admin | Updated: September 4, 2016 00:23 IST2016-09-04T00:18:09+5:302016-09-04T00:23:02+5:30

महिलेच्या प्रसंगावधानाने वाचले हरणाचे प्राण

Prana survived the fate of the woman | महिलेच्या प्रसंगावधानाने वाचले हरणाचे प्राण

महिलेच्या प्रसंगावधानाने वाचले हरणाचे प्राण

 येवला : अन्नाच्या शोधात ममदापूर देवदरी रस्त्यावर भटकंती करत असताना मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाचे याच रस्त्यावरून ममदापूर येथे उपचारासाठी जात असलेल्या महिलेच्या प्रसंगावधानामुळे प्राण वाचले.
देवदरी - ममदापूर रस्त्यावर अन्नाच्या शोधात हरणाची पिले भटकंती करत असताना मोकाट कुत्र्यांनी हरणांच्या पिल्लांवर हल्ला केला. याच रस्त्यावरून ममदापूरकडे उपचारासाठी जात असलेल्या वालूबाई मोरे या महिलेच्या लक्षात आल्याने तिने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्याने परिसरातील अनिल शिंदे व संतोष मोरे हे त्याठिकाणी तत्काळ धावून आले व हरणाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले.
या हल्ल्यात हरणाच्या पोटाला व पायाला जखम झाल्याने त्याला देवदरी येथील पशुचिकित्सक डॉ. प्रदीप दाणे यांनी प्राथमिक उपचार करून वनविभागाला भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली.
राजापूर वनविभागाचे कर्मचारी दौड व वाघ यांनी घटनास्थळी आल्यानंतर या जखमी हरणाला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. याप्रसंगी संतोष मोरे, बहिरू शिंदे, ज्ञानेश्वर दाणे आदिंनी मदतकार्य
केले. (वार्ताहर)

 

Web Title: Prana survived the fate of the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.