विद्यार्थिनीच्या प्रसंगावधानाने वाचले अंध महिलेचे प्राण

By Admin | Updated: July 22, 2014 00:45 IST2014-07-21T23:55:38+5:302014-07-22T00:45:20+5:30

विद्यार्थिनीच्या प्रसंगावधानाने वाचले अंध महिलेचे प्राण

Prana in the eyes of the blind woman read in the incident | विद्यार्थिनीच्या प्रसंगावधानाने वाचले अंध महिलेचे प्राण

विद्यार्थिनीच्या प्रसंगावधानाने वाचले अंध महिलेचे प्राण

द्याने : आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये कुणी सहसा कुणाला मदत करीत नाही; परंतु उत्राणे येथील सहावीतील विद्यार्थिनीने ट्रकखाली येणाऱ्या अंध महिलेचे प्राण वाचविले असून, तिचे कौतुक होत आहे.
द्याने जनता विद्यालयातील सहावीत शिकणारी दीपाली रामदास पगार व तिचा लहान भाऊ तेजस दोघे त्यांच्या घरी परतत होते. तेजस सायकल चालवत होता. दीपाली सायकलवर मागे बसली होती. रस्त्यात जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार यांच्या घरासमोर समोरून भरधाव वेगाने मालट्रक येत होता.
दीपालीचे लक्ष रस्त्याच्या मध्यभागी चालणाऱ्या एक अंध महिलेकडे गेले. अंध स्त्री ट्रकखाली चिरडेल हे बघून दीपालीने सायकलवरून उडी मारली. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्या ट्रकखाली येणाऱ्या अंध स्त्रीला ओढले.
ट्रक पुढे भरधाव वेगाने निघून गेला. त्यामुळे अंध महिलेचे प्राण वाचले. सायकल पडली. दीपालीच्या पायाला खरचटले तिने त्या स्त्रीला कुठे जायचे विचारपूस केली. तिने यतिन पगार यांच्या घरी जायचे, असे सांगितले. तिने तिला पोहोचते केले. दुसऱ्या दिवशी वर्गशिक्षिका श्रीमती सावळा यांच्याकडे विद्यार्थिनीने घटना कथन केली. त्यांनी कौतुकाने ५० रुपये दिले. मात्र तिने सार्वजनिक सत्काराला नकार दिला. (वार्ताहर)

Web Title: Prana in the eyes of the blind woman read in the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.