लोकमततर्फे १ जुलैपासून प्राणायाम, ध्यानधारणा शिबिर
By Admin | Updated: June 30, 2016 00:44 IST2016-06-29T23:06:07+5:302016-06-30T00:44:41+5:30
लोकमततर्फे १ जुलैपासून प्राणायाम, ध्यानधारणा शिबिर

लोकमततर्फे १ जुलैपासून प्राणायाम, ध्यानधारणा शिबिर
नाशिक : लोकमत सखी मंच व क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमत सखी मंच सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांकरिता शुक्रवार, दि. १ ते ३ जुलै या कालावधीत जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे ज्ञानसूत्र देणाऱ्या ‘प्राणायाम व ध्यानधारणा’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून शिबिरात योग, ध्यान व प्राणायामबद्दल प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले आहे. पंधरा वर्ष वयोगटावरील कोणतीही व्यक्ती शिबिरात सहभागी होऊ शकणार असून शिबिरास येताना सोबत सतरंजी वा बेडशीट आणावे. सैलसर कपडे परिधान करून यावेत. दुपारच्या वर्गासाठी १२ वाजेच्या आत हलकेसे जेवण करावे.
इच्छुकांना शिबिराच्या पहिल्या दिवसापासूनच केंद्रनिहाय निर्धारित वेळेत उपस्थित राहून सहभागी होता येणार आहे. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी केंद्रनिहाय ०२५३-६६४७५३० या क्रमांकावर फोन करून आपला प्रवेश निश्चित करावा. योगप्रेमींनी जिल्ह्णात ठिकठिकाणी होणाऱ्या या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)