शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ प्रकाश थवील यांची उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 19:10 IST

नाशिक- महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीचे वादग्रस्त सीईओ प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी करण्याचा निर्णय महापालिकेच्या महासभेत घेण्यात आला. थविल यांच्या वागणूक, नगरसेवकांना माहिती न देणे यासह अन्य कारभारावर नगरसेवकांनी ताशेरे ओढले आणि कंपनीच्या कारभारामुळे महापालिकला बदनाम होत असल्याचा आरोप केला. त्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी थविल यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देखील सोमवारी (दि. ९) झालेल्या महासभेत दिले.

ठळक मुद्देमहापालिकेच्या महासभेत निर्णयस्मार्ट रोड, पार्कींगवरून नगरसेवकांनी काढले वाभाडे

नाशिक- महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीचे वादग्रस्त सीईओ प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी करण्याचा निर्णय महापालिकेच्या महासभेत घेण्यात आला. थविल यांच्या वागणूक, नगरसेवकांना माहिती न देणे यासह अन्य कारभारावर नगरसेवकांनी ताशेरे ओढले आणि कंपनीच्या कारभारामुळे महापालिकला बदनाम होत असल्याचा आरोप केला. त्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी थविल यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देखील सोमवारी (दि. ९) झालेल्या महासभेत दिले.महापालिकेची महासभा सोमवारी (दि.९) पार पडली. यावेळी मखमलाबाद येतील नगररचना परियोजना राबविण्यासाठी इरादा जाहिर करण्याच्या विषयावरून स्मार्ट सिटीच्या कामकाजावर वादळी चर्चा झाली. विशेषत: प्रकाश थवील यांना दुरध्वनी केल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही याबाबत कंपनीचे संचालक व नगरसेवक गुरूमित बग्गा यांती तक्रार केली तेव्हा थविल हे हासत होते. त्यामुळे थविल यांच्या कारभारावर नगरसेवकांनी ताशेरे ओढलेच शिवाय त्यांना महापालिकेकडून कंपनीला किती निधी मिळाला आणि २१ कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात येत असल्याच्या रस्त्याची रूंदी देखील सांगता आली नाही त्यामुळे आवाक झालेल्या साऱ्याच सदस्यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या सभागृहाने असे अनेक अधिकारी बघितले आहेत. गेल्यावर्षी तत्कलीन आयुक्त तुकाराम मुंढे नगरसेवक बोलत असताना असेच हसत असायचे त्यामुळे तुमचे काय होईल ते बघा असे सांगत त्यांना सूचक इशारा देखील दिला. त्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी थविल यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देखील सोमवारी (दि. ९) झालेल्या महासभेत घेतला.महासभेत झालेल्या चर्चेत सुधाकर बडगुजर, शाहु खैरे, डॉ. हेमलता पाटील स्मार्ट सिटीच्या कामकाजावर टीका केलीच. शिवाय स्थायी समिती सभापती उध्दव निमसे यांनी मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड योजना यशस्वी करायची असेल तर थविल यांची बदली करून चांगला अधिकारी नियुक्त करण्याची मागणी केली होती.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाSmart Cityस्मार्ट सिटी