अमित पंड्या विद्यालयात शिक्षकांचा गुणगौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:13 IST2021-09-13T04:13:38+5:302021-09-13T04:13:38+5:30
वंजारवाडी येथील अमित विद्यालयात आयोजित गुणवंत शिक्षक सत्कार कार्यक्रमाच्या सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने करण्यात आली. यानंतर, मुख्याध्यापक प्रवीण रोकडे ...

अमित पंड्या विद्यालयात शिक्षकांचा गुणगौरव
वंजारवाडी येथील अमित विद्यालयात आयोजित गुणवंत शिक्षक सत्कार कार्यक्रमाच्या सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने करण्यात आली. यानंतर, मुख्याध्यापक प्रवीण रोकडे यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. अमित पंड्या विद्यालयात वर्षभर अनेक उपक्रम राबविले जात असून, यामध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण रोकडे यांच्यासह शिक्षकवृंद मोलाची भूमिका बजावत असतात. यावेळी मुख्याध्यापक रोकडे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना माजी राष्ट्रपती डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याविषयीच्या आठवणींना उजाळा देत, त्यांनी केलेल्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांची भूमिका सार्थपणे पार पाडल्याबद्दल विद्यालयातील १८ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे, गुणवंत शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी एक दिवस शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांना आलेले अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले. सूत्रसंचालन परदेशी यांनी केले, तर श्रीमती कर्पे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी पुष्पा कुलकर्णी, मनीषा तोंडे, मुख्याध्यापक प्रवीण रोकडे, भगूर शिक्षण मंडळाचे सरचिटणीस जीवन गायकवाड, विशाल शिरसाठ, संदीप गंधे, कांचन काळे, चंद्रशेखर ओहोळ, अमरसिंग परदेशी, श्रीमती कर्पे आदींसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो- १२ पंड्या स्कूल
वंजारवाडी येथील अमित पंड्या विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक प्रवीण रोकडे, समवेत व्यासपीठावर अध्यक्षा मीना पाटील, शिक्षण मंडळाचे सरचिटणीस जीवन गायकवाड, श्रीमती काळे व इतर मान्यवर.
120921\12nsk_4_12092021_13.jpg
फोटो- १२ पंड्या स्कूल