धान्य किराणा व्यापारी संघटना अध्यक्षपदी पुन्हा प्रफुल्ल संचेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:13 IST2021-01-18T04:13:08+5:302021-01-18T04:13:08+5:30

नाशिक : धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा प्रफुल्ल संचेती ...

Prafulla Sancheti again as the President of Grain Grocery Traders Association | धान्य किराणा व्यापारी संघटना अध्यक्षपदी पुन्हा प्रफुल्ल संचेती

धान्य किराणा व्यापारी संघटना अध्यक्षपदी पुन्हा प्रफुल्ल संचेती

नाशिक : धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, संघटनेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा प्रफुल्ल संचेती यांची निवड झाली आहे. धान्य किराणा व्यापाऱ्यांची वार्षिक सभा रविवारी (दि. १७) खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत नवीन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी अशोक वैश्य, सचिवपदी राकेश भंडारी व सहसचिवपदी प्रसाद जाजू यांची बिनविरोध निवड झाली असून, उर्वरित कार्यकारिणी निवडण्याचे अधिकार नव्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सभेस परेश बोधानी, राहुल डागा, हेमंत पवार, नेमीचंद सोनी, अर्जुन आहुजा, शेखर औरंगाबादकर, मनोज वडेरा, कल्पेश बेदमुथा, पंकज लोढा, राजेश मालपुरे, प्रमोद छाजेड, महावीर खटोड, जितेंद्र बोरा, सुनील मुंदडा, मनोज जैन, विपुल शाह, श्रेणिक ओहरा, नीलेश पटेल, विष्णू पटेल, बाबूभाई पटेल, धीरज बोरा, राहुल लुनावत, केतन हरकुट, पीयूष बोरा, अमित नागशेटिया, नीलेश भंडारी, आदी घाऊक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या शेवटी अध्यक्षांनी आभार मानले.

(आरफोटो-१७किराणा मर्चंट) नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेचे नूतन अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांच्यासमवेत अशोक वैश्य, शेखर औरंगाबादकर, चंद्रकांत दीक्षित, प्रसाद जाजू, अविनाश पाठक, राकेश भंडारी.

--------------------

Web Title: Prafulla Sancheti again as the President of Grain Grocery Traders Association