‘प्रबोधिनी’च्या विद्यार्थ्यांनी साजरी केली कुसुमाग्रज निवासस्थानी दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:42 PM2019-10-19T23:42:22+5:302019-10-20T00:55:33+5:30

दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा चालविणाऱ्या प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाची साफसफाई करून दीपोत्सवाच्या पर्वाचा प्रारंभ केला. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील या बालकांनी स्वहस्ते सर्व परिसर लखलखीत करून रांगोळ्या काढून आकाशकंदील लावत आनंद द्विगुणित केला.

Prabodhini students celebrate Diwali at Kusumagraj residence | ‘प्रबोधिनी’च्या विद्यार्थ्यांनी साजरी केली कुसुमाग्रज निवासस्थानी दिवाळी

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानाच्या प्रांगणात रांगोळी काढताना प्रबोधिनीच्या विद्यार्थिनी.

googlenewsNext
ठळक मुद्देदीपोत्सव पर्वास प्रारंभ; रांगोळ्या काढून लावले आकाशकंदील

नाशिक : दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा चालविणाऱ्या प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाची साफसफाई करून दीपोत्सवाच्या पर्वाचा प्रारंभ केला. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील या बालकांनी स्वहस्ते सर्व परिसर लखलखीत करून रांगोळ्या काढून आकाशकंदील लावत आनंद द्विगुणित केला.
प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दिवाळीपूर्वीकुसुमाग्रज यांच्या निवासस्थानी जाऊन दीपोत्सवाच्या पर्वाचा प्रारंभ घराबाहेरील परिसर स्वच्छ करून करण्यात येतो.
विद्यार्थ्यांनी संपूर्ण आंगण करीत तरणतलावाच्या चौकातील कुसुमाग्रज साहित्याचे शिल्प तसेच प्रवेशद्वारावरील त्यांच्या काव्याचा फलक लखलखीत केला. त्यानंतर मुला-मुलींनी मिळून अंगणात सुंदर रांगोळ्या काढल्या. तसेच कुसुमाग्रजांच्या फोटोसमोरील भागात आकर्षक आकाशकंदील टांगून दीपोत्सवाचा प्रारंभ केला. या उपक्रमावेळी कुसुमाग्रजांच्या कार्याची महती सांगितली.
विद्यार्थ्यांनी काढलेली भव्य रांगोळी पाहून वाचनालयातील पदाधिकाऱ्यांनीदेखील त्यांचे कौतुक केले. या दिव्यांग विद्यार्थ्यांनादेखील या नावीन्यपूर्ण कलाप्रकारात योगदान दिल्याचा आनंद त्यांच्या चेहºयावरून झळाळत होता. दिवाळीच्या निमित्ताने या उपक्रमासह विद्यार्थ्यांची एक शैक्षणिक सहलदेखील निघाल्याने या सहलीसह सहभोजनाचा आनंददेखील विद्यार्थ्यांनी घेतला. या उपक्रमामुळे प्रत्यक्ष कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी येण्यास मिळाल्याने आनंद झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.


त्यांना निवासस्थान आणि वाचनालयाचे दर्शनदेखील घडवण्यात आले.

Web Title: Prabodhini students celebrate Diwali at Kusumagraj residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.