एकलहरे येथील शक्तिमान शिल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:19 IST2021-09-04T04:19:40+5:302021-09-04T04:19:40+5:30

एकलहरे औष्णिक वीज केंद्रातील येथील टप्पा क्रमांक एक व दोनमधील स्क्रॅप मटेरियलपासून तयार करण्यात असलेला तसेच विजेचे प्रतीक ...

Powerful sculptures at Ekalhare | एकलहरे येथील शक्तिमान शिल्प

एकलहरे येथील शक्तिमान शिल्प

एकलहरे औष्णिक वीज केंद्रातील येथील टप्पा क्रमांक एक व दोनमधील स्क्रॅप मटेरियलपासून तयार करण्यात असलेला तसेच विजेचे प्रतीक असलेल्या ‘शक्तिमान’ शिल्पाची भव्यता नजरेत भरते. नाशिकचे शिल्पकार डॉ. सुधीर देशपांडे यांच्या संकल्पनेतून १९८९ मध्ये हे शिल्प तयार करण्यास सुरुवात झाली. सतत आठ महिने कल्पकतेने काम करून १९९० मध्ये पूर्ण झाले. या शिल्पाचे वजन २७ टन असून उंची १७ मीटर आहे. नाशिकचे भूषण कवी कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकरांच्या हस्ते या शिल्पाचे उद्घाटन करण्यात आले. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या शिल्पाची नोंद झाली आहे. पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या या शिल्पाची पुन्हा एकदा पर्यटकांना माहिती देण्याची गरज आहे.................. छायाचित्र आर फेाटोवर ०३ शक्तिमान

Web Title: Powerful sculptures at Ekalhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.