पावरडील कंपनी कर्मचाºयांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:38 IST2017-08-06T01:37:52+5:302017-08-06T01:38:11+5:30

नाशिक तालुक्यातील विल्होळी येथील पावरडील एनर्जी सिस्टीम कंपनीने जानेवारीपासून केलेल्या बेकायदेशीर टाळेबंदीच्या निषेधार्थ सीटू युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

Powerful company employees' demonstrations | पावरडील कंपनी कर्मचाºयांची निदर्शने

पावरडील कंपनी कर्मचाºयांची निदर्शने

नाशिक : नाशिक तालुक्यातील विल्होळी येथील पावरडील एनर्जी सिस्टीम कंपनीने जानेवारीपासून केलेल्या बेकायदेशीर टाळेबंदीच्या निषेधार्थ सीटू युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकाºयांना निवेदनही देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, कंपनीच्या व्यवस्थापनाने जानेवारी २०१७ पासून बेकायदेशीर टाळेबंदी जाहीर करून कामगारांना काम देणे बंद केले आहे. यापूर्वीही कंपनीने अशीच बेकायदेशीरपणे टाळेबंदी केली होती व कामगार खात्याने सदर टाळेबंदी बेकायदेशीर ठरवून कामगारांना कामावर घेण्याचे निर्देश दिले होते. आता पुन्हा व्यवस्थापनाने अशीच बेकायदेशीर टाळेबंदी जाहीर केली असून, ती तत्काळ उठवून कामगारांना काम देण्यासाठी हस्तक्षेप करण्यात यावा, कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना आठ महिन्यांचे वेतन कामगारांना दिलेले नाही, कंपनीचे मालक महेश खैरनार यांनी यापूर्वीच कामगारांना वेतन देण्याचे मान्य केले होते, परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप केली नसल्याने कामगारांना त्यांचे थकीत वेतन मिळाव.अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. कंपनीचे थकीत वेतन न मिळाल्याने कामगार अजय रामनाथ मते या कामगाराने अलीकडेच आत्महत्या केल्याची तक्रारही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली असून, शासनाने त्वरित हस्तक्षेप करून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे. यावेळी सीताराम ठोंबरे, कॉ. श्रीधर देशपांडे, तानाजी जायभावे, तुकाराम सोनजे, संतोष काकडे, देवीदास अडोळे, हरिभाऊ तांबे, संतोष कुलकर्णी, कल्पना शिंदे, सतीश खैरनार आदी उपस्थित होते.

Web Title: Powerful company employees' demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.