शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक धोरणामुळे कामगार संघटनांची शक्ती खिळखिळी : भालचंद्र कांगो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:17 IST

भाजपा सरकार शेतकरी व कामगारांच्या विरोधात धोरण आखून अन्याय करत आहे. या सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून, सरकारच्या विरोधात कामगार, शेतकरीवर्ग एकवटला असून, सर्व संघटनांच्या वतीने एल्गार पुकारला आहे.

नाशिक : भाजपा सरकार शेतकरी व कामगारांच्या विरोधात धोरण आखून अन्याय करत आहे. या सरकारने जनतेचा विश्वास गमावला असून, सरकारच्या विरोधात कामगार, शेतकरीवर्ग एकवटला असून, सर्व संघटनांच्या वतीने एल्गार पुकारला आहे.जानेवारी महिन्यात होणाऱ्या देशव्यापी संपात मोठ्या संख्येने सहभागी होऊन ताकद दाखवावी. कामगारविरोधी व नवीन आर्थिक धोरणांमुळे संघटनांची शक्ती खिळखिळी झाली आहे, असे प्रतिपादन भाकपचे राष्टय सचिव कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो यांनी केले.आयटकच्या वतीने आयोजित दोनदिवसीय १८व्या त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी कांगो बोलत होते. आयटकचे प्रदेशाध्यक्ष सुकुमार दामले हे अध्यक्षस्थानी होते. श्रीकृष्ण लॉन्स येथे होत असलेल्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन शर्मा, महासचिव देवीदास तुळजापूरकर, श्यामजी काळे, राजू देसले आदी उपस्थित होते.यावेळी कांगो म्हणाले, बेरोजगारी, असंघटित कामगारांचे प्रश्न, किमान वेतनाच्या प्रश्नासह विविध समस्या उभ्या ठाकल्या आहेत; मात्र या सरकारला या समस्यांशी देणे-घेणे नाही. सरकार केवळ सर्वसामान्य जनतेच्या विरोधात निर्णय घेण्यात मग्न आहे.कायदा-सुव्यवस्था व संविधानाने दिलेले अधिकार हे धोक्यात आले आहे. देशातील सर्व कायदे बासनात गुंडाळण्याचा प्रयत्न भाजपा सरकारने चालविला आहे.  जानेवारीमध्ये पुकारण्यात आलेला संप हा संविधान वाचविण्यासाठीदेखील असणार आहे. कामगार संविधानाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचे महाराष्टला दिसून येईल, असा दावा त्यांनी केला. अधिवेशनामध्ये ८ व ९ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदबाबत नियोजन, कामगारविरोधी संकटांवर मात करण्यासाठी चर्चा, सरकारच्या कामगारविरोधी धोरणांवर विचारमंथन करण्यात येत आहे. दुपारच्या सत्रात कृषी अभ्यासक मिलिंद मुरुगकर यांनी शेतकरी कामगारांच्या चळवळीची एकजूट ही काळाची गरज या विषयावर मत मांडले.

टॅग्स :Employeeकर्मचारीNashikनाशिक