येवला तालुक्यात वीजचोरी शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:39 IST2020-12-04T04:39:12+5:302020-12-04T04:39:12+5:30

येवला : तालुक्यात महावितरणच्या पथकाने वीजचोरी शोधमोहीम राबवून सुमारे तीन लाखांची वीजचोरी उघड केली आहे, तर वीजचोरी करणार्‍या २८ ...

Power theft search operation in Yeola taluka | येवला तालुक्यात वीजचोरी शोधमोहीम

येवला तालुक्यात वीजचोरी शोधमोहीम

येवला : तालुक्यात महावितरणच्या पथकाने वीजचोरी शोधमोहीम राबवून सुमारे तीन लाखांची वीजचोरी उघड केली आहे, तर वीजचोरी करणार्‍या २८ लोकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

उपकार्यकारी अभियंता विनायक इंगळे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अभियंता मनोज जगताप, उमेश देवरे, सूरज हुरपडे, पिकल दुसाने, अस्वले आदींच्या पथकाने तालुक्यातील भारम, कोळम, वाघाळे, सायगाव, धामणगाव, पांजरवाडी, रहाडी येथे वीजचोरी शोधमोहीम राबविली. यावेळी २८ जणांविरुद्ध भारतीय वीज अधिनियम २००३ कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. यातून सुमारे तीन लाख रुपयांचे वीजबिल वसुली होणार आहे.

सदर मोहिमेत १७ कृषिपंपांचा अनधिकृत वीजपुरवठादेखील खंडित करण्यात आला आहे. दरम्यान, येवला शहरात महावितरणची २६१ लाख तर ग्रामीणमध्ये १५८ लाख अशी तालुक्यात एकूण ४२३ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता विनायक इंगळे यांनी दिली.

फोटो- ०३ येवला थेफ्ट

Web Title: Power theft search operation in Yeola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.