नाशिकरोडला पावसामुळे वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST2021-04-30T04:19:17+5:302021-04-30T04:19:17+5:30

चौकट=== कोविड सेंटरमध्ये धावपळ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व ऑक्सिजनचा तुटवडा त्यामुळे अत्यंत अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात अनेक ...

Power supply to Nashik Road disrupted due to rains | नाशिकरोडला पावसामुळे वीजपुरवठा खंडित

नाशिकरोडला पावसामुळे वीजपुरवठा खंडित

चौकट===

कोविड सेंटरमध्ये धावपळ

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व ऑक्सिजनचा तुटवडा त्यामुळे अत्यंत अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात अनेक खासगी डॉक्टरांनी तात्पुरते कोविड सेंटर सुरू केले आहे. पावसाचे आगमन झाल्यानंतर बहुतांश ठिकाणी महावितरणकडून जो सप्लाय दिला जातो त्या ठिकाणी कार्बन साचते, त्या कार्बनवर पाण्याचे थेंब पडले की कुठली दुर्घटना होऊ नये म्हणून लागलीच ऑटोमॅटिक त्या भागातील वीजपुरवठा खंडित होऊन जातो. तात्पुरते कोरोना सेंटर सुरू केले आहे त्याठिकाणी अथवा जेथे कोविड सेंटर आहे तिथे विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर पर्यायी वीज सुरू होण्याची व्यवस्था असणे आजच्या घडीला खूप गरजेचे आहे. ती व्यवस्था नसेल आणि ऑक्सिजन पुरवठा बंद झाला तर दुर्देवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित डॉक्टर, जिल्हा प्रशासन, मनपा व महावितरण यांनी सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

Web Title: Power supply to Nashik Road disrupted due to rains