शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

संभाजी क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडिअमचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:52 AM

खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, साफसफाई नाही, तसेच शौचालयाची दुरवस्था यांसह अनेक कारणांनी सध्या गाजत असलेल्या अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडिअमधील वीजपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून महावितरणने खंडित केला आहे. यामुळे वीजपुरवठ्यावर सुरू असलेले सेतू कार्यालय तसेच मैदानातील म्युझिकवर सुरू राहणारे गाणे बंद झाले

सिडको : खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, साफसफाई नाही, तसेच शौचालयाची दुरवस्था यांसह अनेक कारणांनी सध्या गाजत असलेल्या अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडिअमधील वीजपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून महावितरणने खंडित केला आहे. यामुळे वीजपुरवठ्यावर सुरू असलेले सेतू कार्यालय तसेच मैदानातील म्युझिकवर सुरू राहणारे गाणे बंद झाले असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. या गोष्टीला तब्बल आठ दिवस उलटूनही ढिसाळ व नियोजनशून्य कारभार असलेल्या मनपाकडून दखल घेतली जात नसल्याने क्रीडाप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.  अश्विननगर येथील राजे संभाजी इनडोअर स्टेडिअमची संपूर्ण वाताहत झाली असून, सर्वत्र घाण, माती साचलेली, अस्वच्छता, शौचालयाची दुरवस्था झालेली असे असतानाच गेल्या आठ दिवसांपासून बिल न भरल्याने महावितरण कंपनीने इनडोअर स्टेडिअमचा वीजप्रवाह खंडित केला आहे. संपूर्ण इनडोअर स्टेडिअममध्ये धूळ व घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याने याबाबत नुकतीच क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त करीत मनपा प्रशासनाचा निषेध नोंदविला. शिवसेनेचे माजी नगरसेवक मामा ठाकरे यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून राजे संभाजी क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. सेतू कार्यालयदेखील बंद बिल न भरल्याने राजे संभाजी क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडिअमचा वीजपुरवठा गेल्या आठ दिवसांपूर्वी महावितरण कंपनीने खंडित केला असल्याने याच ठिकाणी असलेले सेतू कार्यालयदेखील बंद आहे. यामुळे सेतूसंबंधित कामासाठी येणाºया विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे हाल होत आहेत. याबरोबरच मैदानातील जॉगिंग ट्रॅकवर लावण्यात आलेले म्युझिकल गाणेदेखील बंद झाले आहे.इनडोअर स्टेडिअममध्ये खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था तसेच इतर सुविधा करणे अपेक्षित होते; परंतु निधी उपलब्ध नसल्याचे कारण मनपाकडून सांगण्यात येत आहे. सध्या थंडीचे दिवस असल्याने इनडोअर गेम खेळण्यासाठी सकाळपासून क्रीडाप्रेमींची गर्दी होते. मैदानालगतच उभारण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅकवरही नागरिक सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी येतात. याठिकाणी मनपाने बास्केटबॉल, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल व अंतर्गत खेळ खेळण्यासाठी इनडोअर स्टेडिअम उभारले आहे.परंतु आजही याठिकाणी एका खासगी शाळेच्या कार्यक्रमासाठी हे इनडोअर स्टेडिअम भाड्याने दिले असल्याचे दिसून आले आहे. या इनडोअर स्टेडिअममध्ये इनडोअर खेळ होणे अपेक्षित असताना महापालिका मात्र हे इनडोअर स्टेडिअम खासगी कार्यक्रमांसाठी भाड्याने देत असल्याने क्रीडापे्रमींनी नाराजी व्यक्त केली आहे असून याबाबत कारवाईची मागणी होत आहे.