कळवण तालुक्यातील पाच गावांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 16:10 IST2021-06-28T16:08:52+5:302021-06-28T16:10:40+5:30
कळवण : तालुक्यातील पथदीपांची अकरा कोटी रुपये थकबाकी झाल्याने पाच गावांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीकडून खंडित करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन अंबाडकर यांनी दिली.

कळवण तालुक्यातील पाच गावांचा वीजपुरवठा खंडित
कळवण : तालुक्यातील पथदीपांची अकरा कोटी रुपये थकबाकी झाल्याने पाच गावांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीकडून खंडित करण्यात आला आहे, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नितीन अंबाडकर यांनी दिली.
तालुक्यात २०१ पथदीप असून, थकबाकी ११.१८ कोटी आहे. महावितरणच्या थकबाकीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये पाच पथदीप ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. ग्रामपंचायतींच्या या पथदीपांची थकबाकी ११.१८ कोटींवर पोहोचली आहे. पाणीपुरवठा योजना वीज बिलांची एकूण ३.२३ कोटी थकबाकी असून, ग्रामपंचायतींकडून बिल भरणा नियमित नसल्याने थकबाकी वाढत आहे.
तालुक्यातील पाणीपुरवठा जोडणी संख्या १०६ आहे. तालुक्यातील देसराणे, रवळजी, कनाशी, वाडी बुद्रुक, वाडी खुर्द या गावांच्या पथदीपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचा अभोणा दोन, कनाशी दोन, सप्तशृंगगड एक, ओतूर एक वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीज देयके नियमित अदा करावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.