ठाणगाव : तालुक्यातील ठाणगाव येथील कृषिपंपधारकांनी थकीत असलेली वीजबिलात ५० ते ६५ टक्के सूट घेऊन थकीत रक्कम तातडीने भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित केली जाणार असल्याची माहिती महावितरणचे अभियंता वैभव थोरे यांनी ठाणगावी आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांना माहिती दिली. ठाणगाव महावितरण कार्यालयाकडून शेतकऱ्यांसाठी थकीत असलेल्या कृषी बिल योजनेची माहिती देण्यासाठी बैठक आयोजित केली होती. शेतकऱ्यांनी आपल्या थकीत वीजबिलावर ५० ते ६५ टक्के सूट मिळवून शेतकऱ्यांना विजेच्या ज्या समस्या येथील त्या महावितरण सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ठाणगाव शाखेचे आभियंता वैभव थोरे यांनी सांगितले. शेतकऱ्यानी वीजबिले भरण्यासाठी महावितरण कार्यालयात न येता ग्रामपंचायतीने मागणी केल्यास ग्रामपंचायत कार्यालयात वीजबिल भरणा सुरू करण्यात येईल. वसूल होणाऱ्या बिलातून ग्रामपंचायतींनादेखील ३३ टक्के उत्पन्न मिळणार असल्याचे थोरे यांनी सांगितले.
थकबाकीदारांचा वीजपुरवठा करणार खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 00:43 IST