ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीवर परिवर्तन पॅनलची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 10:07 PM2021-02-12T22:07:31+5:302021-02-13T00:42:07+5:30

ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किरण मधुकर अहिरे यांची तर रिपाईचे बापूराज तुळशीराम खरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

Power of Parivartan Panel over Brahmangaon Gram Panchayat | ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीवर परिवर्तन पॅनलची सत्ता

ब्राह्मणगाव ग्रामपंचायतीवर परिवर्तन पॅनलची सत्ता

Next

ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किरण मधुकर अहिरे यांची तर रिपाईचे बापूराज तुळशीराम खरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.  ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवड प्रसंगी नवोदित सर्व १७ सदस्य उपस्थित होते. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलला ७,नम्रता पॅनलला ७ जागा तर ३ अपक्ष उमेदवार विजयी झाले होते. ग्रामपंचायतीवर परिवर्तन पॅनलची तीन अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्यात आली . निवड प्रक्रियेत दुपारी १२ वाजेपर्यंत सरपंचपदासाठी परिवर्तन पॅनलचे किरण अहिरे, शोभा अहिरे तर नम्रता पॅनल तर्फे अरुण अहिरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते तर उपसरपंच पदासाठी परिवर्तन पॅनलचे बापूराव खरे तर नम्रता पॅनल तर्फे कैलास नवरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात दुपारी २ वाजता परिवर्तन पॅनलचे शोभा अहिरे, नम्रता पॅनलचे अरुण अहिरे यांनी तसेच कैलास नवरे यांनी माघार घेतल्याने निवडणूक अधिकारी विजय पगार यांनी सरपंचपदी किरण मधुकर अहिरे तर उपसरपंचपदी बापूराव खरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले.  याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच परिवर्तन पॅनलचे नेते यशवंत अहिरे, पंचायत समिती सदस्य अतुल अहिरे, सुभाष अहिरे, विश्वास खरे, संदीप अहिरे, नितीन अहिरे, अशोक अहिरे, सुनील अहिरे, कैलास मालपाणी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तर गावातील बौद्ध मंदिरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आदिवासी वस्तीत भगवान एकलव्य , राजमाता अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

Web Title: Power of Parivartan Panel over Brahmangaon Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक