सुरगाण्यात ४० तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:15 IST2021-05-20T04:15:05+5:302021-05-20T04:15:05+5:30

सुरगाणा : तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे सुरगाणा व शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा गेल्या चाळीस तासांपेक्षा जास्त काळ खंडित ...

Power outage in Surgana for more than 40 hours | सुरगाण्यात ४० तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित

सुरगाण्यात ४० तासांपेक्षा अधिक काळ वीजपुरवठा खंडित

सुरगाणा : तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे सुरगाणा व शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा गेल्या चाळीस तासांपेक्षा जास्त काळ खंडित राहिल्याने सर्वांनाच अडचणींचा सामना करावा लागला आहे. तौक्ते वादळाचा तडाखा तालुक्यालादेखील बसला आहे. तालुक्यात ठिकठिकाणी घरांचे छप्पर उडाल्याने, तर काही ठिकाणी आंबा पिकाचे नुकसान झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. या वादळामुळे दिंडोरीकडून सुरगाणा तालुक्याला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीत बिघाड झाला. यामुळे सोमवारी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान वीजपुरवठा खंडित झाला. सुरगाणा येथे नगरपंचायत कार्यालयापासून काही अंतरावर असलेले तीन विद्युत खांब कोसळले. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत विद्युत खांब उभे करण्यात येऊन तारा ओढण्याचे काम सुरू होते. सोमवारी सकाळी खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांना जोरदार पाऊस व वादळ वाऱ्यामुळे अडचणी येत होत्या. तरीही त्यांचे प्रयत्न सुरू राहिले. दरम्यान, मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान वीजपुरवठा सुरू झाला. मात्र तो नियमित राहू शकला नाही. यादरम्यान खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण झाली होती. बुधवारी सकाळी उशिरानंतर शहरातील काही भागात वीजपुरवठा सुरू झाला तर काही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने दुपार उलटूनही वीजपुरवठा सुरू झालेला नव्हता. तालुक्यात देखील वीजपुरवठा खंडित झाला आहे. (१९ सुरगाणा)

===Photopath===

190521\19nsk_12_19052021_13.jpg

===Caption===

१९ सुरगाणा

Web Title: Power outage in Surgana for more than 40 hours