वादळी वाऱ्यामुळे विज पुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 07:10 PM2021-05-29T19:10:22+5:302021-05-30T00:02:09+5:30

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खो-यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार वा-यासह पावसाने हजेरी लावली. जोरदार वा-यामुळे अनेक झाडासंह वीजेचे खांब पडुन वीज पुरवठा खंडीत झाला.

Power outage due to strong winds | वादळी वाऱ्यामुळे विज पुरवठा खंडीत

सिन्नर तालुक्यातील नायगाव खो-यात जोरदार पाऊस व वा-यामुळे शेतात वाकलेला वीजेचा खांब.

Next
ठळक मुद्देसिन्नर तालुक्यातील नायगावी दुसऱ्या दिवशीही पाऊस

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खो-यात सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार वा-यासह पावसाने हजेरी लावली. जोरदार वा-यामुळे अनेक झाडासंह वीजेचे खांब पडुन वीज पुरवठा खंडीत झाला.

नायगाव खो-यातील परिसरात शुक्रवार व शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली.अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली. सलग दोन दिवस आलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचुन नुकतीच लागवड झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाबरोबर आलेल्या जोरदार वा-यामुळे परिसरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार झाले. तसेच वीजेचे खांब व तारा पडल्याने नायगाव खो-यातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.
दोन दिवस पडलेल्या पावसामुळे छोटे-मोठे खड्डे भरले आहे. विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होण्यास व खरिपाच्या हंगामास मदत होणार असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त होत आहे.
 

Web Title: Power outage due to strong winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.