वडांगळी संस्थेत ‘शेतकरी विकास’ची सत्ता
By Admin | Updated: May 23, 2016 23:14 IST2016-05-23T23:13:38+5:302016-05-23T23:14:33+5:30
पंचवार्षिक निवडणूक : दीपक खुळे गटाचा पराभव

वडांगळी संस्थेत ‘शेतकरी विकास’ची सत्ता
सिन्नर : तालुक्यातील वडांगळी विकास संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार माणिकराव कोकाटे समर्थक शेतकरी विकास पॅनलने सत्ता कायम राखण्यात यश मिळवले. विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे व शिवसेना तालुकाप्रमुख दीपक खुळे यांच्या गटाला संपूर्ण पराभव पत्करावा लागला.
संस्थेच्या १३ जागांसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी राखीव गटातील पाचही जागांवर दीपक खुळे गटाने माघार घेतल्याने इतर मागास प्रवर्गातून सचिन पंडित खुळे, विमुक्त भटक्या जाती जमाती गटातून नारायण कांदळकर, अनुसूचित जाती जमाती गटातून आनंद अडांगळे, महिला राखीव प्रवर्गातून मीराबाई खुळे, मंगला खुळे या कोकाटे समर्थक बिनविरोध निवडून आले होते.
निकाल जाहीर होताच कोकाटे समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला. शेतकरी पॅनलचे
नेतृत्व सुदेश खुळे, पंचायत समिती सदस्य रामदास खुळे, विद्यमान
अध्यक्ष शिवाजी खुळे, उपाध्यक्ष पांडुरंग खुळे, दत्तात्रय खुळे यांनी
केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय गायकवाड यांनी काम पाहिले. (वार्ताहर)