शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरण उपकेंद्र : दीडशे किलो कॉपर वायडींग अन् सहाशे लिटर ऑइल चोरट्यांनी केले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 16:34 IST

नाशिक : आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विंचूर फाटा सैय्यद पिंप्री रोडवरील 132 के. व्ही. आडगाव उपकेंद्रातून उघड्या जागेवर ठेवलेले ...

ठळक मुद्देआडगावला विज वितरण उपकेंद्रात चोरी

नाशिक : आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विंचूर फाटा सैय्यद पिंप्री रोडवरील 132 के. व्ही. आडगाव उपकेंद्रातून उघड्या जागेवर ठेवलेले हजारो रुपये किंमतीचे विजेचे उपकरणे व साहित्य भुरट्या चोरांनी लांबवून विज वितरण कंपनीला 'शॉक' दिला आहे. याबाबत द्वारका काठे गल्ली येथे राहणाऱ्या गणेश खोलमकर यांनी आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.गेल्या मंगळवारी सकाळी चोरी झाल्याचे निदर्शनास आले. 132 के.व्ही. उपकेंद्र आवारात काही दिवसांपूर्वी विज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांनी 150 किलो वजनाच्या जुन्या कॉपर वायडींग  वायर, 600 लिटर इन्सुलेटिंग ऑइल ठेवलेले होते.अज्ञात चोरट्यांनी आडगाव उपकेंद्र आवारात प्रवेश करून उपकेंद्रातून सदर 72 हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरून नेल्या आहे सदर प्रकार विज वितरण कंपनी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी वरिष्ठांना माहिती कळविली त्यानंतर आडगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.यापूर्वी देखिल नाशिक शहरात अनेकदा भुरट्या चोरट्यांनी विज वितरण कंपनी वस्तू चोरून नेण्याचे धाडस केले आहे. आता तर भुरट्या चोरट्यांनी थेट उपकेंद्र कार्यालय गाठत त्या ठिकाणाहून वायर्स, ऑइल चोरी करून एकप्रकारे विज वितरण कंपनीलाच आर्थिक शॉक दिल्याचे बोलले जात आहे.

 

 

 

 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरीmahavitaranमहावितरण