शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या सरी कोसळताच वीज विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:25 IST

पंचवटी : सोमवारी सायंकाळी पावसाने काहीकाळ हजेरी लावताच संधी साधणाऱ्या वीज कंपनीने संपूर्ण हिरावाडी परिसराचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे रात्री ११ वाजेनंतरदेखील सुरळीत न झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. वीजपुरवठा सुरुळीत करण्याबाबत कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, तेथून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून शेकडो ग्राहकांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देशहरात अनेक घटना : पंचवटीत नागरिक संतप्त;इंदिरानगर, पाथर्डी फाटा, गंगापूररोड, शरणपूररोडला वीज खंडित

पंचवटी : सोमवारी सायंकाळी पावसाने काहीकाळ हजेरी लावताच संधी साधणाऱ्या वीज कंपनीने संपूर्ण हिरावाडी परिसराचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे रात्री ११ वाजेनंतरदेखील सुरळीत न झाल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. वीजपुरवठा सुरुळीत करण्याबाबत कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, तेथून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून शेकडो ग्राहकांनी वीजवितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नागरिकांना ‘बिजली गूल’चा फटका सहन करावा लागल्याने आगामी काळात वीजवितरण कंपनी ग्राहकांना असेच वेठीस धरणार का? असा सवाल केला जात आहे.हिरावाडी परिसरातील बनारसीनगर, शक्तीनगर, भगवतीनगर, अभिजितनगर, शिवकृपानगर, पाटकिनार परिसर भागात रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण अंधाराचे साम्राज्य पसरले होते. नागरिकांच्या घरातील बिजली गूल होण्यापाठोपाठ मुख्य रस्त्यावर असलेले पथदिवेदेखील बंद असल्याने किर्रर्र अंधार पसरलेला होता.नाशिकनाशिकरोडच्या अनेक भागात अंधाररोडच्या अनेक भागात अंधारनाशिकरोड : गेल्या शनिवारपासून पहिल्या पावसात विजेचा सुरू झालेला खेळखंडोबा अजूनही सुरूच आहे. विशेष म्हणजे नाशिकरोडच्या अनेक भागात रात्रीच्या सुमारास वीज गायब होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे.पावसाच्या कालावधीत दरवर्षी विद्युत रोहित्र तसेच वीज वाहिन्यांमध्ये बिघाड होत असल्याने वीजपुरवठा खंडित होत असतो त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो वीज वितरण कंपनीने पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवणे गरजेचे असले तरी पावसाळ्याच्या पहिल्या दुसºया दिवसापासूनच वीजपुरवठा खंडित होत असल्याने आगामी कालावधीत वीज वितरण कंपनी वारंवार वीजपुरवठा खंडित करून ग्राहकांना अशाप्रकारे अंधारात ठेवणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे.तक्रार क्रमांक बिझीपरिसरातील वीज खंडित झाली किंवा विद्युत रोहित्रात बिघाड झाल्यास वीज वितरण कंपनीकडे तक्रार नोंदविण्यासाठी वीज वितरण कंपनीने ग्राहकांना एका मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे; मात्र सदरचा क्रमांक सतत बिझी येत असल्याने नागरिकांना संताप व्यक्त करावा लागला. वीजवितरण कंपनीने सदरचा मोबाइल क्रमांक पंचवटी परिसरातील तक्रार नोंदविण्यासाठी ग्राहकांना उपलब्ध करून दिलेला असला तरी अत्यावश्यक वेळी सदर क्रमांक सतत बिझी दाखवित असल्याने ग्राहकांना वारंवार नंबर डायल करावा लागला. अखेर फोन लागलाच नाही.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज