वीजप्रश्नी संरक्षण खाते अनुकूल
By Admin | Updated: July 11, 2015 23:00 IST2015-07-11T22:59:06+5:302015-07-11T23:00:03+5:30
वीजप्रश्नी संरक्षण खाते अनुकूल

वीजप्रश्नी संरक्षण खाते अनुकूल
नाशिकरोड : एकलहरे येथे नवीन ६६० मेगावॉट वीज निर्मिती प्रकल्पाबाबत प्रस्तावित अधिनियमानुसार लष्करी विभागाने रोखलेला ना हरकत दाखला अस्तित्वात असलेल्या अधिनियमानुसार देण्याची सूचना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण विभागाला केली असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकाद्वारे दिली.
खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन एकलहरे येथील ६६० मेगावॉटच्या प्रकल्पाला लष्करी विभागाने ना हरकत दाखला न दिल्याने रखडला असल्याचे स्पष्ट केले. नवीन प्रस्तावित अधिनियमाप्रमाणे १५० मीटरच्या वर परवानगी देता येत नसल्याने लष्करी विभागाने ना हरकत दाखला अद्याप दिलेला नाही. यामुळे वीज निर्मितीचा तुटवडा व इतर विविध प्रश्नासंदर्भात गोडसे यांनी पर्रीकर यांच्याशी चर्चा केली. याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अस्तित्वात असलेल्या अधिनियमानुसार संरक्षण विभागाला निर्णय घेण्याची सूचना केली आहे.
ओझर विमानतळावर विमान उतरताना लक्ष ठेवण्याचे शुल्क एचएएलकडून आकारले जाणार असल्याने त्याचा भार प्रवाशांवर पडणार आहे. (प्रतिनिधी)