वीज कंपनीच्या कॉपरपट्ट्यांची चोरी
By Admin | Updated: August 22, 2016 00:06 IST2016-08-21T22:41:13+5:302016-08-22T00:06:13+5:30
वीज कंपनीच्या कॉपरपट्ट्यांची चोरी

वीज कंपनीच्या कॉपरपट्ट्यांची चोरी
मालेगाव : शहरातील कालीकुट्टी मैदानावरील कल्लूशाह बाबा दरगाह व बाबूशेठ वाडा येथील महावितरण कंपनीच्या मालकीच्या बॉक्स पेटीमधून आठ हजार ९०० रुपये किमतीच्या कॉपरपट्ट्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या.
वीज कंपनीचे सहायक
अभियंता भालचंद्र जाधव यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. रविवारी पहाटे अडीच ते तीन वाजेदरम्यान ही घटना घडली. अधिक तपास पोलीस नाईक आहेर करीत आहेत.
(प्रतिनिधी)