औद्योगिक वसाहतीवर ‘परिवर्तन’ची सत्ता

By Admin | Updated: August 9, 2015 22:24 IST2015-08-09T22:24:18+5:302015-08-09T22:24:48+5:30

स्टाईस निवडणूक : परिवर्तनला दहा, तर प्रगती पॅनलला दोन जागा

The power of 'change' over industrial colonies | औद्योगिक वसाहतीवर ‘परिवर्तन’ची सत्ता

औद्योगिक वसाहतीवर ‘परिवर्तन’ची सत्ता

मुसळगाव : सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी व्यवस्थापक नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने १२ पैकी १० जागा जिंकून संस्थेत परिवर्तन घडविले. विद्यमान अध्यक्ष दिलीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी प्रगती पॅनलला अवघ्या दोन जागा मिळाल्या.
संचालक मंडळाच्या १२ जागांसाठी रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान पार पडले. ३५९ मतदारांपैकी ३३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यात परिवर्तन पॅनलला दहा तर प्रगती पॅनलला दोन जागा मिळाल्या.
कारखानदार गटात परिवर्तन पॅनलचे संदीप नामकर्ण आवारे (१८५), प्रभाकर दिगंबर बडगुजर (१७५), अरुण किसनराव चव्हाणके (१८४), किशोर सुरेश देशमुख (१६६) व अविनाश एकनाथ तांबे (१७८) हे विजयी झाले, तर प्रगती पॅनलचे नेते दिलीप रामराव शिंदे (१६७) व सुनील दादाजी कुंदे (१६७) या दोन उमेदवारांनी विजय मिळवला. परिवर्तन पॅनलच्या विठ्ठल माधव जपे (१५९), दिलीप दलीचंद कुचेरिया (१४१) या दोघा उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. प्रगती पॅनलचे अरुण केरूजी डावखर (१०९), भगतसिंग सिंगारासिंग राजपूत (१३२), विजय भाऊराव सपकाळ (११८), संजय संपतराव शिंदे (१३४), अजय कचरदास बेदमुथा (१४३) यांच्यासह अपक्ष उमेदवार प्रवीण वसंत गद्रे (६०) यांचा पराभव झाला.
महिला राखीव गटाच्या दोन जागांवर परिवर्तन पॅनलच्या मीनाक्षी बाबासाहेब दळवी (१९७) व पद्मा जगदीश सारडा (१८३) विजयी झाल्या. त्यांनी प्रगती पॅनलच्या रेखा सुनील जोंधळे (१३९), विजया बंडू पगार (१२७) यांचा पराभव केला.
अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघात परिवर्तन पॅनलच्या चिंतामण पुंजाजी पगारे (१७५) यांनी प्रगती पॅनलच्या सुधीर गंगाधर वाकचौरे (१५८) यांना नमविले. विमुक्त जाती-भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग राखीव मतदारसंघात परिवर्तन पॅनलच्या रामदास भास्कर दराडे (१८८) यांनी प्रगती पॅनलच्या नारायण वामन पाटील (१४२) यांचा पराभव केला. इतर मागास प्रवर्गाच्या राखीव मतदारसंघात परिवर्तन पॅनलच्या पंडितराव विठ्ठल लोंढे (१८५) यांनी विजय मिळवला, तर प्रगती पॅनलचे प्रशांत रामचंद्र नाईक (१४८) पराभूत झाले. निवडणूक निकालानंतर परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवार व समर्थकानी एकच जल्लोष केला. (वार्ताहर)

Web Title: The power of 'change' over industrial colonies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.