दारिद्र्य निर्मूलनाचा आराखडा ग्रामपातळीवर तयार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 20:36 IST2021-01-30T20:32:30+5:302021-01-30T20:36:20+5:30

लोहोणेर : गावाचा विकास साधण्यासाठी प्रथम गावातील समस्या कोणत्या आहेत. कोणती विकासकामे हाती घेण्यात येवून ते पूर्णत्वास न्यायची आहेत, यांचे मायक्रो नियोजन करून एक विकास आराखडा तयार करावा व सदरची कामे शासनदरबारी मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून पाच वर्षांत गावाचा विकास साधावा. दारिद्र्य निर्मूलनासाठी खऱ्या अर्थाने प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असून दारिद्र्य निर्मूलनाचा आराखडा ग्रामपातळीवर तयार करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी लोहोणेर येथे ग्रामपंचायत सदस्य सत्कार समारंभ बोलताना केले.

Poverty alleviation plan should be prepared at village level | दारिद्र्य निर्मूलनाचा आराखडा ग्रामपातळीवर तयार करावा

लोहोणेर येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सत्कार समारंभात बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड. समवेत देवीदास सोनवणे, संदीप सोनवणे, प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा आदी.

ठळक मुद्देलिना बनसोड : लोहोणेर ग्रामपंचायतीतर्फे कार्यक्रम

लोहोणेर : गावाचा विकास साधण्यासाठी प्रथम गावातील समस्या कोणत्या आहेत. कोणती विकासकामे हाती घेण्यात येवून ते पूर्णत्वास न्यायची आहेत, यांचे मायक्रो नियोजन करून एक विकास आराखडा तयार करावा व सदरची कामे शासनदरबारी मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून पाच वर्षांत गावाचा विकास साधावा. दारिद्र्य निर्मूलनासाठी खऱ्या अर्थाने प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज असून दारिद्र्य निर्मूलनाचा आराखडा ग्रामपातळीवर तयार करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी लोहोणेर येथे ग्रामपंचायत सदस्य सत्कार समारंभ बोलताना केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक देवीदास सोनवणे, उद्योजक संदीप सोनवणे, परिवर्तन पॅनलचे नेते प्रसाद देशमुख, राकेश गुळेचा उपस्थित होते. लीना बनसोड म्हणाल्या की, शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा मिळावा महिलांना डोक्यावर हंडा घेऊन इतरत्र फिरण्याची वेळ येवू नये म्हणून शासनाने हर घर नळकनेक्शन योजना सुरू केली आहे. या माध्यमातून २ लाख ४२ हजार नळ कनेक्शन देण्यात आले आहेत. १५ व्या वित्त आयोगाचा निधी आता थेट ग्रामपंचायत खात्यात वर्ग करण्यात येत आहे. त्यांचा लाभ गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी करू, असे आवाहन बनसोड यांनी केले. कार्यक्रमास सतीश देशमुख, योगेश पवार, रमेश आहिरे, अनिल आहिरे, निबा धामणे, धोंडू आहिरे, चंद्रकात शेवाळे, संजय सोनवणे, पूजा सोनवणे, प्रतिभा सोनवणे, उषाबाई सोनवणे, पौर्णिमा अहिरे, सविता शेवाळे, आदींसह परिवर्तन पॅनलचे नवनिर्वाचित सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नाना पाठक यांनी केले.

Web Title: Poverty alleviation plan should be prepared at village level