नांदूरशिंगोटे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:44 IST2018-09-21T00:43:36+5:302018-09-21T00:44:10+5:30

नांदूरशिंगोटे : नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यांत माल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या नांदूरशिंगोटे ते लोणी रस्त्यावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आठ महिन्यांत दोन वेळेस रस्त्याची दुरुस्ती करूनही दुरवस्था झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते ते पावसाने पुन्हा मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून रस्त्याची परिस्थिती ‘जैसे थे’च झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Pothole empire on the road to Nandurshore | नांदूरशिंगोटे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

नांदूरशिंगोटे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

ठळक मुद्देप्रवाशांमध्ये संताप : डांबरीकरण उखडल्याने वाहनधारकांचे हाल

नांदूरशिंगोटे : नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यांत माल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेल्या नांदूरशिंगोटे ते लोणी रस्त्यावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आठ महिन्यांत दोन वेळेस रस्त्याची दुरुस्ती करूनही दुरवस्था झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते ते पावसाने पुन्हा मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून रस्त्याची परिस्थिती ‘जैसे थे’च झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिक - पुणे महामार्गाला जोडलेला नांदूरशिंगोटे ते लोणी हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा रस्ता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील रस्ता सर्वाधिक खराब झाला होता. नांदूरशिंगोटेपासून जिल्हा हद्दीपर्यंत सुमारे अडीच किलोमीटर अंतरात प्रंचड खड्डे पडले आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक - पुणे रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यापासून नांदूरशिंगोटे लोणी रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सदर रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती. जागोजागी खड्डे भरताना व्यवस्थित पध्दतीने भरण्यात आलेले नाही, ओबडधोबड कामे, रस्त्याची वरचेवर मलमपट्टी करून थातूरमातूर खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला आहे.
या रस्त्याने वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. अडीच किलोमीटरच्या अंतरावर काही ठिकाणी अर्धवट साईडपट्ट्या ठेवण्यात आल्या आहेत. ज्या खड्ड्यांचे डांबरीकरण करण्यात आले आहे ते पुन्हा आठ महिन्यांत उखडण्यास प्रारंभ झाला आहे. नांदूरशिंगोटे ते लोणी हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी अंधारात खड्डे वाचवितांना दुचाकीस्वारांचे दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. रस्त्यावरील खड्डे त्रासदायक ठरू लागले आहेत. पर्यटक व यात्रेकरू पर्यायाने याच रस्त्याचा वापर करतात. गेल्या काही दिवसांत रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने खड्डे बुजवून दुरुस्ती करावी.
- भाऊ पाटील शेळके,
माजी सरपंच, नांदूरशिंगोटे

Web Title: Pothole empire on the road to Nandurshore