घोटी-सिन्नर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
By Admin | Updated: August 2, 2015 23:59 IST2015-08-02T23:59:20+5:302015-08-02T23:59:54+5:30
निवेदन : वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी

घोटी-सिन्नर महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
इगतपुरी : घोटी-सिन्नर बायपास मार्गावरील मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, तालुका मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या वतीने इगतपुरीचे तहसीलदार व नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाद्वारे घोटी-सिन्नर बायपास महामार्गावर दीड वर्षांपासून खड्ड्यांचे साम्राज्य असून, हा प्रवासाच्या दृष्टीने वेळेची, पैशाची बचत करणारा अत्यंत महत्वाचा बायपास आहे. या रस्त्याने २ वर्षापुर्वी वाहतुकीची नेहमीच वर्दळ असायची ती आता रोडावली असून मुंबई-घोटी-सिन्नर-शिर्डी हा मार्ग शासनाने "साई पालखी मार्ग" घोषित केला असल्याने या बायपासने वर्षभर अनेक मंडळांच्या पायी साई पालखी सोहळे चालूच असतात. त्यात सुमारे २००-३०० भाविक सहभागी असतात.
खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनचालक त्याची साईट सोडून आटयापाटया खेळत समोरच्या वाहनाची समोरासमोर जबर धडक होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे.तसेच या रस्त्याने प्रवास करताना विदयार्थी, नोकरदार, शेतकरी यांना आपला जीव मुठीत घेऊन तणावग्रस्त भयभीत वातावरणाचा सामना करावा लागतो. तसेच प्रवाशांच्या पाठीचे मानदुखीचे प्रमाण वाढलेले आहे.
तसेच ट्रक,टेम्पो यांचे पाटे तुटणे, टायर पंक्चर होणे यामुळे शेतकर्यांना त्यांचा नाशवंत शेतीमाल घोटी,सिन्नर बाजार समतिीत नेणे अतिशय जिकिरीचे बनले आहे. सर्वसामान्यांच्या आहारातील जिवनावश्यक
दूधाची वाहतूक करणारे टॅकरदेखील बिघाड होत असून त्यामुळे दूधपुरवठा उशीरा होत असल्याने व्यावसायिकांपाठोपाठ शेतकय्राला देखील आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो. त्यामुळे सदर बायपासचे खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
यावेळी निवेदन देतेवेळी संभाजी ब्रिगेड ग्रामीण उपजिल्हाप्रमुख मनोज सहाणे, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष मिलींद कुकडे, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष शरद पागेरे, ईश्वर सहाणे, संतोष सहाणे, गोपीनाथ गायकवाड, रमेश सहाणे उपस्थित होते. (वार्ताहर)