किशोर सागर धरणातील पाणी योजनेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:12 IST2021-06-01T04:12:19+5:302021-06-01T04:12:19+5:30

जिल्ह्यात सहा वर्षांपूर्वी ज्या ग्राम पंचायतींचे रूपांतर नगर पंचायतीत करण्यात आले होते, त्यात देवळा ग्राम पालिकेचा समावेश होता. देवळा ...

Postponement of Kishore Sagar Dam water project | किशोर सागर धरणातील पाणी योजनेला स्थगिती

किशोर सागर धरणातील पाणी योजनेला स्थगिती

जिल्ह्यात सहा वर्षांपूर्वी ज्या ग्राम पंचायतींचे रूपांतर नगर पंचायतीत करण्यात आले होते, त्यात देवळा ग्राम पालिकेचा समावेश होता. देवळा नगर पंचायतीचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२० मध्ये समाप्त झाल्यानंतर कोरोनामुळे नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. देवळा नगर पंचायतीवर उपविभागीय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, सन २०२०-२१ नगरोत्थान योजना (जिल्हास्तर) पाच विकासकामांसाठी ९८ लक्ष रुपये निधी मंजूर असून, चार कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी ३५ लक्ष रुपये खर्च झाले आहेत.

सन २०२१-२२ साठी ९ कामांसाठी २३७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला असून, दोन कामे पूर्ण झाली आहेत. यासाठी २८ लक्ष रुपये खर्च झाला आहे. उर्वरित कामांचा प्रारंभ लवकरच करण्यात येणार आहे.

पावसाळापूर्व कामांसाठी ६२ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, नाले साफसफाई व स्वच्छता आदी कामे सुरू आहेत.

सन २०२०-२१ ची मार्च अखेरपर्यंत घरपट्टी ६२ टक्के व पाणीपट्टी ५२ टक्के वसूल झाली आहे. यामुळे नगर पंचायतीला कोरोनाच्या महामारीत बऱ्यापैकी आधार मिळाला. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे नगर पंचायतीला निधीची कमतरता पडत नाही. परंतु, कोरोनामुळे मजुरांची टंचाई निर्माण होऊन चालू वर्षी विकासकामांची गती मात्र मंदावली आहे. गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले, त्यावेळी शहरात विविध विकासकामे सुरू होती. नगर पंचायत प्रशासनाने कोरोनाच्या संकटातही बगिचा, कचरा डेपो शेड, पेव्हर ब्लॉक, भूमिगत गटारी, बाजारपट्टी, पाच कंदील चौक सुशोभीकरण, खाटकी नाला रस्ता आदी कामांपैकी बहुतेक कामे पूर्ण केली होती. उर्वरित कामे प्रगतिपथावर होती.

कोट...

शहरात पावसाळापूर्व नाले साफसफाईची व इतर कामे सुरू आहेत. नगर पंचायतीची घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यास नागरिकांनी सहकार्य न केल्यास पाणीपुरवठा कर्मचारी व समावेशन न झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.

- संदीप भोळे, मुख्याधिकारी, नगर पंचायत, देवळा

फोटो - ३१ देवळा नगर पंचायत

रामेश्वर येथे किशोर सागर धरणावर सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला शासनाने स्थगिती दिल्याने बंद पडलेले काम.

===Photopath===

310521\31nsk_61_31052021_13.jpg

===Caption===

फोटो - ३१ देवळा नगरपंचायत रामेश्वर येथे किशोर सागर धरणावर सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाला शासनाने स्थगितीदिल्याने बंद पडलेले काम. 

Web Title: Postponement of Kishore Sagar Dam water project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.