पदवीधरची निवडणूक लांबणीवर

By Admin | Updated: September 20, 2016 00:30 IST2016-09-20T00:29:48+5:302016-09-20T00:30:12+5:30

नव्याने होणार मतदार यादी : यंत्रणा संभ्रमातच

Postponed election postponed | पदवीधरची निवडणूक लांबणीवर

पदवीधरची निवडणूक लांबणीवर

नाशिक : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून सदस्य निवडून पाठविण्यासाठी वापरली जाणारी मतदार यादी प्रत्येक वेळी नवीन करण्याच्या कायदेशीर तरतुदीचे पालन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे डिसेंबर महिन्यात होऊ घातलेली नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. नवीन मतदार यादी तयार करण्यासाठी लागणारा कालावधी पाहता, आता फेब्रुवारी महिन्यात या निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रशासकीय यंत्रणा व राजकीय पक्ष तयारी करीत असताना त्यांच्या या प्रयत्नांना ब्रेक मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा (पान ७ वर)
या राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी कायदेशीर तरतुदीच्या आधारे नवीन मतदार यादी तयार करण्याच्या सूचना देत, त्यासाठी कार्यक्रमही निश्चित केला आहे. १ आॅक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०१६ या सव्वा महिन्याच्या कालावधीत नवीन मतदारांची नोंदणी करून ३० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याच्या सूचना केल्या आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले डॉ. सुधीर तांबे यांची मुदत ५ डिसेंबर २०१६ रोजी संपुष्टात येत आहे.
त्यांची मुदत संपुष्टात येण्यापूर्वीच म्हणजेच नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात या मतदारसंघात निवडणूक होऊ शकते, असा अंदाज बांधून निवडणूक यंत्रणेने तयारी केली होती तर राजकीय पक्षांनीदेखील त्याच पार्श्वभूमीवर उमेदवार घोषित करून प्रचाराला सुरुवातही केली होती. नाशिक विभागात जवळपास तीन लाख ४० हजार इतके पदवीधर असून, नाशिक जिल्ह्यात हीच संख्या एक लाख ३० हजाराच्या आसपास आहे. आता नवीन आदेशामुळे या सर्वांना पुन्हा नव्याने मतदार नोंदणी करावी लागणार आहे. ३० डिसेंबर २०१६ रोजी निवडणूक आयोग नवीन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणार असून, त्यानंतरच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी किमान ४५ दिवसांचा लागणारा कालावधी पाहता फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात या मतदारसंघात मतदान होऊ शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे. या मतदार नोंदणीत डी.एड झालेले शिक्षक, डी. फार्मसी व कृषी पदवीधारक यांना वगळण्यात आलेले आहे. थोडक्यात पदविकाधारक मतदार होऊ शकत नाहीत.
पुरवणी यादीबाबत संभ्रम
सन २००९च्या निवडणुकीत तयार करण्यात आलेली पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीचे पुनरीक्षण करण्याचा कार्यक्रम आयोगाने आॅक्टोबर २०१५ मध्ये घोषित केला होता. त्यावेळी नवीन मतदारांची नोंदणी तसेच त्यांची छायाचित्रेही गोळा करण्यात येऊन नाशिक जिल्ह्यात जवळपास ३८ हजार नवीन मतदार नोंदण्यात आले. आयोगाने संपूर्ण मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या सूचना दिल्याने पुरवणी यादीत समाविष्ट असलेल्या ३८ हजार मतदारांचीही नव्याने नोंदणी करावी की नवीन यादीत त्यांचा समावेश करावा, असा प्रश्न निवडणूक यंत्रणेला पडला आहे. त्यासाठी आयोगाचे मार्गदर्शन मागविण्यात येणार आहे. पुरवणी यादीबाबत संभ्रम सन २००९च्या निवडणुकीत तयार करण्यात आलेली पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीचे पुनरीक्षण करण्याचा कार्यक्रम आयोगाने आॅक्टोबर २०१५ मध्ये घोषित केला होता. त्यावेळी नवीन मतदारांची नोंदणी तसेच त्यांची छायाचित्रेही गोळा करण्यात येऊन नाशिक जिल्ह्यात जवळपास ३८ हजार नवीन मतदार नोंदण्यात आले. आयोगाने संपूर्ण मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या सूचना दिल्याने पुरवणी यादीत समाविष्ट असलेल्या ३८ हजार मतदारांचीही नव्याने नोंदणी करावी की नवीन यादीत त्यांचा समावेश करावा, असा प्रश्न निवडणूक यंत्रणेला पडला आहे. त्यासाठी आयोगाचे मार्गदर्शन मागविण्यात येणार आहे.

Web Title: Postponed election postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.